शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर कामत सरकारच्या 'त्या' निर्णयाला १४ वर्षांनी न्याय; खंडपीठाने खाण कंपन्यांची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2024 07:36 IST

खनिज व सामग्री वाहतुकीवरील सेस आकारणे वैधच

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: वर्ष २०१० मध्ये गोव्याच्या तत्कालीन काँग्रेस स रकारने जारी केलेल्या खनिज वाहतुकीवर आणि बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवर 'सेस' आकारण्याच्या अधिसूचनेविरुद्ध तत्कालीन खाण कंपन्यांनी केलेली आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने फेटाळली आहे. मात्र तब्बल १४ वर्षानी न्यायालयाने हा निवाडा सुनावला तेव्हा तत्कालीन दिगंबर सरकारही आज राहिलेले नाही आणि खाण उद्योगही चालू राहिलेला नाही.

खनिज उद्योगात खनिज वाहतूक आणि सामग्री वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदुषण होते. ग्रामीण भागात त्याचे मोठे पर्यावरणीय परीणाम होतात. अशा भागात साधन सुविधा निर्माण करण्यासाठी खनिज वाहतुकीवर सेस आकारण्याचा निर्णय सरकारने तेव्हा घेतला होता. त्यासाठी गोवा सेस कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती. त्यासाठी अधिसूचनाही जारी केली होती. मात्र काही खाण कंपन्यांनी आणि इतर बांधकाम साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.

सेझा स्टेरायल लिमिटेड, डी. बी, बांदोडकर सन्स प्रा. लिमिटेड, टाटा मेटलाईक्स लिमिटेड, रेणूका शुगर लिमिटेड, ओरियन्ट गोवा प्रा. लिमिटेड, ग्लोबल कोक लिमिटेड व इतर काही कंपन्यांनी या अधीसूचनेला आव्हान दिले होते. ही अधिसूचना बेकायदेशीर असल्याचा दावा त्यात करण्यात आला होता, घटनात्मक कलमांचा भंग करणारी अधिसूचना असल्याचे म्हटले होते. मुक्त व्यापार आणि आंतरराज्य मालाच्या वाहतुकीवर निबंध घातल्याचाही दावा केला होता. यामुळे अधिसूचनेला अंतरीम स्थगिती देण्यात आली होती.

प्रदीर्घकाळ म्हणजेचतब्बल १४ वर्षांनी या खटल्याचा निकाल देताना खंडपीठाने आव्हान याचिका फेटाळून लावली आहे. गोवा सेसची अधिसूचना वैध असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

काय म्हणाले न्यायालय....

जमीन संसाधनांवर होणाऱ्या प्रदूषणासह पर्यावरणीय प्रदूषण हा गंभीर चिंतेचा विषय आहे, ज्यासाठी देशभरातील सरकार संघर्ष करत आहेत. नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरणाचा नाश होऊन अशा समस्या निव्वळ मानवी निर्मित आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि बी. पी. देशपांडे यांच्या खंडपीठाने प्रदूषक सामग्रीच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या परिणामांचे व्यवस्थापन करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यास सक्षम करणारा कायदा केल्याबद्दल सरकारचे कौतुक ही केले आहे.

 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय