ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ३ : जून महिन्याने गोव्याला भरभरून दिलेला पाऊस हा २६ वर्षांच्या सरासरी पावसापेक्षा - इंचाने अधिक नोंद झाला आहे. त्यामुळे यंदा एकूण पाऊसही अधिक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्यात उशिरा मान्सून दाखल होऊनही सातत्याने पडलेल्या पावसामुळे जून महिन्याच्या अखेरपर्यंत सरासरी ४८ इंच इतकया मोठ्या प्रमाणात पाऊस नोंद झाला. जून २०१५ महिन्यात केवळ ३६ इंच पाऊस नोंद झाला होता. यंदा जून महिन्यात पडलेला पाऊस मागील जूनपेक्षा तर अधीक आहेच, परंतु हे प्रमाण मागील २६ वर्षांत जून महिन्यात पडलेल्या सरासरी पावसापेक्षा १२ इंचाने अधिक आहे. मागील २६ वर्षांत म्हणजे १९६४ ते १९९० या २६ वर्षांच्या काळात सरासरी पाऊस हा ३४ इंच एवढाच होता. यंदा पाऊस हा विश्रांती घेत घेत पडताना दिसतो. सरीवर सरी कोसळ््याचे चित्र एखाद दुसरा अपवाद वगळता पाहायला मिळाले नाही. परंतु दडी मारण्याचा प्रकारही झाला नाही. दर दिवशी पावसाने केवळ हजेरीच लावली असे नव्हे तर ज्या काही सरी कोसळल्या त्या जोरदार कोसळल्या. त्यामुळे एकूण पावसात भरीव वाढ झाली.
जुलै महिना हा अत्यंत महत्त्वाचा असून या महिन्यात पडलेल्या पावसावरच गोव्याचे भवितव्य ठरत असते. भातशेती, पाणी साठा आणि भूजलपातळीसाठीही जुलै महिन्यात मिळणारा पाऊस अत्यंत महत्ची भुमिका बजावत आहे. सध्या मान्सूनसाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एच हरिदासन यांनी दिली. अरबी समुद्रात आणि जमीनीवरीलही वातावरण हे मान्सूनसाठी अत्यंतपुरक असल्यामुळे जून प्रमाणेच जुलै महिनाही बरसेल असा अंदाज हवामान खात्याने बांधला आहे. सरासरी नव्हे मीनमागील २६ वर्षांत पडलेल्या पावसाचा एकत्रित अभ्यास करून सरासरी पाऊस काढला जातो. सामान्य सरासरी काढण्याच्या पद्धतीने तो काढला जात नसून त्यासाठी विशेष फॉर्म्युला वापरला जातो, आणि त्यानुसार काढलेल्या संख्येला सरासरी पाऊस न म्हणता इंग्रजीत ह्यमीनह्ण पाऊस असे म्हणतात. चालू वर्षाचा मान्सून हा मागील २६ वर्षांच्या अनुशंगाने १९९० - २०१६ अशा २६ वर्षांच्या पावसाच्या कालावधीत गणला जातो, तर १९९० पर्यंतचा पाऊस हा २६ वर्षांपूर्वी पासून म्हणजे १९६४ पासून गणला जातो.