शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांसाठी सरकार निधी देण्यास अपयशी, जोसेफ सिक्वेरा यांची टीका

By काशिराम म्हांबरे | Updated: January 16, 2024 15:46 IST

कळंगुट  पंचायतीचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी सरकारवर विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यास अपयश आल्याबद्दल टीका केली आहे. निधी ...

कळंगुट  पंचायतीचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी सरकारवर विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यास अपयश आल्याबद्दल टीका केली आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने पंचायतीला स्वखर्चाने विकास कामे हाती घेणे भाग पडत असल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.तसेच कळंगुट मतदार संघातील विद्यमान आमदार मायकल लोबो आणि आमदार विजय सरदेसाई यांना ओपिनीयन पोलचे जनक जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेत उभारण्यात आलेल्या अपयशाबद्दलही टीका केली आहे. लोबो यांनी उपसभापती असताना तसेआश्वासन दिले होते तसेच दिलेल्या आश्वासनाचे सरदेसाई यांनी समर्थन केले होते. मात्र ४ वर्षानंतर त्यांना आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप सिक्वेरा यांनी केला.ओपिनियन पोल दिनानिमित्त कळंगुट येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात प्रसंगी जोझफ सिक्वेरा बोलत होते. मागील विधानसभेची निवडणूक सिक्वेरा यांनी ककळंगुट मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीवर लढवली होती. सिक्वेरा यांनी सरकार वरील टिकेतून सरकारला घरचा आहेर दिला आहे.विद्यमान आमदार लोबो यांनी चार वर्षांपूर्वी विधानसभेत पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानंतर ते सरकारात मंत्रीपदी सुद्धा आरुढ झाले होते.  मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात अद्यापही त्यांना अपयश आल्याची टीका सिक्वेरा यांनी यावेळी केली. विधानसभेत गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय दयानंद बांदोडकर यांचा पुतळा विधानसभेत उभारण्यात आला आहे, मग जॅक सिक्वेरांचा पुतळा का नाही? असा प्रश्न त्यांनी यावेळी बोलताना केला. फक्त आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करू नका. लोकांना कामही करून दाखवा असे आवाहन सिक्वेरा यांनी केले.  कळंगुट पंचायत क्षेत्रातील अनेक विकास प्रकल्पावर सरकारकडून करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :goaगोवा