शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

गोव्यातील साहित्यिक करणार संयुक्त आंदोलन

By admin | Updated: October 13, 2015 02:55 IST

पणजी : देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांवर तसेच दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खुन्यांच्या विरोधात अद्याप ठोस कारवाई न केल्याने राज्यातल्या

पणजी : देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांवर तसेच दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खुन्यांच्या विरोधात अद्याप ठोस कारवाई न केल्याने राज्यातल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकांनी एकत्र येऊन संयुक्त निषेध आंदोलन करण्याचे ठरविले आहे. याविषयी १४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता पणजी येथील जीसीसीआयच्या सभागृहात बैठक घेण्यात येणार असल्याचे कोकणी साहित्यिक व कोकणी लेखक संघाचे अध्यक्ष एन. शिवदास यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक दत्ता दा. नायक व एन. शिवदास यांनी ही बैठक बोलावली आहे. २००५ साली ‘भांगरसाळ’ पुस्तकासाठी मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार आपण परत करणार असल्याचे एन. शिवदास यांनी जाहीर केले होते; पण आपला निर्णय बुधवारी होणाऱ्या बैठकीपर्यंत स्थगित ठेवल्याचे शिवदास यांनी सांगितले. गोव्यातील सर्व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक एकत्र येऊन यावर निर्णय घेतील, असे ते म्हणाले. साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला असून, आरोपींवर कारवाई न केल्याचा निषेध केल्याने सध्या काही प्रमाणात वातावरण निवळल्याचे ते म्हणाले. बुधवारी होणाऱ्या बैठकीत साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते २० लेखक उपस्थित राहणार असून पद्मश्री पुरस्कार विजेत्या मारिया आवरोरा कुतो, गोव्यात स्थायिक झालेले साहित्यिक सुधीर कक्कर, अमिताव घोष यांचाही त्यात समावेश असेल. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या, लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे वातावरण, धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे नायक यांनी सांगितले. गोव्यात १९७५ पासून ३२ कोकणी लेखकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. यातले काही साहित्यिक हयात नाहीत. हयात असलेल्या पुरस्कार विजेत्यांमध्ये दामोदर मावजो, पुंडलिक नायक, प्रकाश पाडगावकर, रमेश वेळुस्कर, नागेश करमली, महाबळेश्वर सैल, दिलीप बोरकर, माधव बोरकर, हेमा नायक, जयंती नायक, एन. शिवदास, दत्ता दा. नायक, देविदास कदम, अशोक कामत, जेस फर्नांडिस, अरुण साखरदांडे, काशिनाथ शांबा लोलयेकर व तुकाराम शेट यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)