शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जॉन फर्नांडिसना सर्वाधिकार

By admin | Updated: May 23, 2014 01:01 IST

जॉन फर्नांडिसना सर्वाधिकार

पणजी : काँग्रेसचे जे आमदार पक्षासाठी काम करत नाहीत, जे आमदार पक्ष सोडून जाण्याची व नवा पक्ष स्थापन करण्याची भाषा करतात, जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते पक्षविरोधी कारवाया करतात, अशा सर्वांना वठणीवर आणण्याचे सर्वाधिकार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांना दिले आहेत. बेशिस्तीविरुद्ध कारवाई करण्यासाठीची सात सदस्यीय समिती सोनिया गांधी यांच्याकडून मंजूर करून घेऊन प्रदेशाध्यक्ष फर्नांडिस गुरुवारी गोव्यात परतले. तीन दिवसांच्या दिल्ली भेटीवेळी फर्नांडिस यांनी दिग्विजय सिंग यांच्यासह काँग्रेसच्या अनेक केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या व गोव्यातील स्थितीबाबतचा अहवाल त्यांना सादर केला. लोकसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेसच्या वाट्याला अशी स्थिती का आली, याचीही माहिती फर्नांडिस यांनी केंद्रीय नेत्यांना दिली. लोकसभा निवडणुकीवेळी पक्षविरोधी कारवाया झाल्याबाबतच्या ज्या तक्रारी आहेत किंवा ज्या नव्या तक्रारी येतील, त्या तक्रारींच्या अनुषंगाने सात सदस्यीय समिती चौकशी करील व त्यानंतर कारवाई सुरू केली जाईल, असे फर्नांडिस यांनी दिल्लीहून परतल्यानंतर ‘लोकमत’ला सांगितले. निमंत्रकांसह सातही सदस्यांची नावे आपण दोन दिवसांत जाहीर करीन. पक्षविरोधी कारवाया करण्यात आल्याच्या तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर संबंधित आमदाराला किंवा पदाधिकार्‍याला किंवा कार्यकर्त्याला नोटीस पाठवून त्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आला आहे, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. आम्ही सर्व स्तरांवर काँग्रेस पक्ष बळकट करणार आहोत. ज्या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत व जिथे काँग्रेसचे आमदार नाहीत, अशा सर्व मतदारसंघात काँग्रेस पक्ष संघटना सक्रिय केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. बाबूश मोन्सेरात यांच्यासारखे आमदार नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची भाषा करत आहेत, त्याविषयी विचारले असता, फर्नांडिस म्हणाले की, ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे, त्यांनी खुशाल जावे, अशी आता काँग्रेसची भूमिका आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाण्याऐवजी आताच ते पक्षाबाहेर गेलेले बरे. जेणेकरून आम्हाला पक्षाची बांधणी तरी अडचणींविना करता येईल. आम्ही कुणाला थांबवणार नाही. एकदा पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही. (खास प्रतिनिधी)