शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

15 जणांचे प्राण वाचविणाऱ्या हवालदार अविनाश नाईक यांना जीवनरक्षा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:03 IST

जीवनरक्षा पदक नाईक यांना राज्यस्तरीय सोहळ्यात लवकरच देण्यात येईल अशी माहिती गावस यांनी दिली.

मडगाव: दोन वर्षापूर्वी सावर्डे येथे पूल दुर्घटनेच्यावेळी साहसी कामगिरी करुन किमान 15 जणांचा जीव वाचविण्याची कामगिरी करणारा कुडचडे पोलीस स्थानकाचा हवालदार अविनाश नाईक यांना दीड लाखांचा उत्तम जीवनरक्षा पुरस्कार प्राप्त झाला असून दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी मंगळवारी नाईक यांना या पुरस्काराचा धनादेश भेटविला.

जीवनरक्षा पदक नाईक यांना राज्यस्तरीय सोहळ्यात लवकरच देण्यात येईल अशी माहिती गावस यांनी दिली. नाईक यांची कामगिरी निश्चितच गौरवास्पद असून त्यामुळे गोवापोलिसांचीही शान वाढली आहे, असे गावस म्हणाले. सदर दुर्घटना 18 मे 2017 या दिवशी घडली होती. सावर्डेच्या जुवारी नदीत एका इसमाने आत्महत्या केल्याने त्याचा शोध घेणा-या अग्नीशमन दलाच्या पथकाला पहाण्यासाठी लोकांनी सावर्डेच्या जुन्या पुलावर गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीने हा पूल तुटल्याने सुमारे 40 लोक पाण्यात पडले होते. त्यावेळी नदीच्या काठी असलेल्या हवालदार नाईक याने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेत सुमारे 15 जणांना काठावर आणले होते. याच कामगिरीसाठी त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

नाईक यांच्या या कामगिरीबद्दल सांगताना गावस म्हणाले, सावर्डेची ही नदी खोल असून त्यात पोहायलाही जाणो धोक्याचे आहे. असे असतानाही अविनाश नाईक यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचविले. या घटनेबद्दल विचारले असता नाईक यांनी तो प्रसंगच डोळ्यासमोर उभा केला. ते म्हणाले, जे शोधकार्य चालू आहे ते पहाण्यासाठी मी नदीच्या काठी उभा होतो. एवढय़ात पुल कोसळून लोक पाण्यात पडत आहेत हे पाहिल्यावर मी पाठचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी घेतली. मी पंटेमळ-कुडचडे या भागातील असल्याने माङो सर्व बालपण या नदीवरच गेले आहे. त्यामुळे या नदीचा सगळा ठाव ठिकाणा मला माहीत होता. लहानपणापासून मी उत्कृष्ट पोहणारा होतो. त्यामुळेच मी नदीत उडी घेतली. माझ्यामुळे पंधरा जणांचे प्राण वाचले हेच माझ्यासाठी सर्वात मोठे पदक होते.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस