शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

पक्ष गेला उडत; जीत आरोलकर नाराज, मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2024 12:36 IST

आरोलकर व मुख्यमंत्री सावंत यांचे सूर आता बऱ्यापैकी जुळले आहेत.

म. गो. पक्षाचे आमदार जीत आरोलकर हे पक्ष नेतृत्वावर खूपच नाराज आहेत याची कल्पना आता सर्वांनाच आली असेल. माझ्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्वात आधी आहेत आणि त्यानंतर म. गो. पक्ष असे विधान आरोलकर यांनी केले, मुख्यमंत्री सावंत हे भाजपचे नेते आहेत. मात्र आरोलकर व मुख्यमंत्री सावंत यांचे सूर आता बऱ्यापैकी जुळले आहेत. मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर हे मंत्रिपदी आहेत. मात्र ढवळीकर यांच्याशी आरोलकर यांचे पूर्वीसारखे आता पटत नाही. अर्थात ते पटणारही नाही, जीत आरोलकर यांना गृहनिर्माण मंडळाचे चेअरमनपद सरकारने दिले आहे. ढवळीकर हे गृहनिर्माण मंत्री आहेत. मात्र मंत्री या नात्याने ढवळीकर यांच्याकडून जीत आरोलकर यांना हवे तसे सहकार्य मिळत नाही, अशी अधिकारी वर्गात चर्चा आहे. उलट मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून सहकार्य मिळते, पाठिंबा मिळतो. यामुळे जीत मगो पक्षाच्या नेतृत्वावर संतापलेले आहेत. या संतापाचा उद्रेक अधूनमधून सध्या होत असतो.

दीड महिन्यांपूर्वीही एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना जीत आरोलकर यांनी शाब्दिक बॉम्ब टाकला होता. पुढील विधानसभा निवडणूक आपण कोणत्या पक्षाच्या तिकीटावर लढवावी ते लोक व कार्यकर्ते ठरवतील, असे आरोलकर म्हणाले होते. मांद्रे हा जीतचा मतदारसंघ, तिथे मगो पक्ष जिंकला तोच मुळी आरोलकर यांच्यामुळेच. आरोलकर यांना निवडणुकीवेळी मगो पक्षाने निधी दिला नव्हता, त्यांनी स्वतःच्या बळावर पैसा खर्च करून निवडणूक लढवली, आरोलकर मांद्रेत जिंकतील, असे कदाचित ढवळीकर यांनाही निवडणुकीवेळी वाटले नसावे. मात्र जीत जिंकले. डिचोलीत नरेश सावळ व फोंड्यात केतन भाटीकर हरलेच. शिवाय प्रियोळमध्ये मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हेही पराभूत झाले. आता सुदिन व जीत या दोघांमुळेच विधानसभेत मगो पक्षाचे अस्तित्व आहे.

नरेश सावळ यांनी नुकताच मगो पक्ष सोडला. सावळ यांनी कार्यकर्त्याना सोबत घेऊन मगोच्या नेतृत्वावर सडकून टीकाही केली. वीज खात्यात नोकर भरती करताना आपल्या कार्यकत्यांना पदे दिली गेली नाहीत याचा राग सावळ यांनी काढला. जीत आरोलकर यांचा मुद्दा थोडा वेगळा आहे. आरोलकर यापूर्वी म्हणाले होते की, आपल्याला खूश ठेवावे, आनंदी ठेवावे म्हणून मगो पक्षाने काही केले नाही. जीत आरोलकर यांच्या मनातील खदखद खूप पूर्वी भाजपने व मुख्यमंत्री सावंत यांनी ओळखलेली आहे. जीत यांना गोंजारण्याचे काम मुख्यमंत्री करतात. आता लोकसभा निवडणुकीपुरती भाजपला ढवळीकर यांची गरज आहे. त्यानंतर मोठीशी गरज नसेल याचीही कल्पना लोकांना येतेच, समजा मोदी सरकार पुन्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या जागा जिंकून सत्तेवर आले तर एकूण देशाचेच राजकारण बदलणार आहे. काही धडाकेबाज निर्णय होतील. 

गोव्यातील राजकारणातही हलचल होऊ शकते. विरोधी काँग्रेस शिल्लक राहिल काय हा जसा प्रश्न आहे, तसाच मगो पक्षाच्या अस्तित्वाचाही प्रश्न आहेच. मगो पक्षाची बोट सध्याच हेलकावे खात आहे. पूर्वी बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांनी मगो पक्षाची साथ सोडली होती. ते दोघेही भाजपमध्ये गेले होतेच. कदाचित २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जीत यांनाही भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर येऊ शकते. मगोपचे अस्तित्व वेगळे आणि शिल्लक ठेवावे की नाही असा प्रश्न लोकसभा निवडणूक निकालानंतर येणारच आहे.जीत यांना वाऱ्याची दिशा कळालेली आहे.

जीत म्हणतात की, आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आपला वारंवार संवाद होत असतो. त्यांच्याशीच सातत्याने संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांचा शब्द माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझा मगो पक्ष हा निवडणुकीपुरता माझ्यासाठी असतो. जीत यांच्या या विधानांतून बरेच काही कळून येते. भाजपला येत्या निवडणुकीवेळी मांद्रेतून तेरा हजार मते मिळवून देण्याची ग्वाही जीत यांनी पूर्वीच दिलेली आहे. मांद्रे मतदारसंघात मुख्यमंत्री सावंत यांच्या कृपेने जीत हे विविध विकास कामे पुढे नेत आहेत, असे सांगितले जाते. तिथे नवे पोलिस स्थानकही झाले, यापुढे जॉगर्स पार्कही होणार आहे. कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे हेही जीत यांचे मित्र आहेत. गोविंद गावडे हे तर ढवळीकर यांचे राजकीय वैरीच आहेत, जीत यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे घेतलेले शिष्यत्व गोविंद गावडे यांनाही निश्चितच आवडत असेल.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण