शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दुस-याकडे न सोपवणं चुकीचं- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 21:36 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारासाठी राज्याबाहेर जाताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एखाद्या मंत्र्याकडे देण्याऐवजी मर्यादित अधिकार असलेली तीन मंत्र्यांची समिती नियुक्त करून घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला.

पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारासाठी राज्याबाहेर जाताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एखाद्या मंत्र्याकडे देण्याऐवजी मर्यादित अधिकार असलेली तीन मंत्र्यांची समिती नियुक्त करून घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दुस-याकडे न सोपवून पर्रीकरांनी राज्याचं नुकसान केल्याचा आरोप शांताराम नाईक यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा आजार लवकर बरा व्हावा, असे आपल्यासह काँग्रेसलाही वाटते. परंतु त्यांच्या आजारामुळे राज्याचे आरोग्य बिघडू देता कामा नये. फायली अडून असल्यामुळे प्रशासन ठप्प झाले आहे. एका माणसाच्या आजारामुळे संपूर्ण राज्याला वेठीस धरले जात आहे हे बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले. दुस-या मंत्र्याकडे जबाबदारी देण्याऐवजी मंत्र्यांना ५० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार देणे, ५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार तीन मंत्र्यांना देणे हे काय प्रकार चालले आहेत ? याला कोणता संविधानिक आधार आहे ? आणि ५ कोटी रुपये खर्चापेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावाचे काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्रिमंडळावर विश्वास नाही. खुद्द भाजपमधील मंत्र्यांवर आणि आमदारांवरही विश्वास नाही असाच त्याचा अर्थ होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप व घटक पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाचे काय झाले त्याचा कुणी तरी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. माडाला राज्यवृक्षाचा दर्जा देण्याची एक गोष्ट सोडून या कार्यक्रमपत्रिकेवरील कोणतीच गोष्ट करण्यात आलेली नसल्याचे ते म्हणाले. किमान समान कार्यक्रमात दीनदयाळ उपाध्याय गोवा फॉरवर्डला कसे चालतात, असेही त्यांनी विचारले. आरोग्य विमा योजनेला सरकारने दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिले आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर