शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचाच आमच्याकडे युतीसाठी होता आग्रह: गोवा फॉरवर्डने केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2024 13:24 IST

विजय सरदेसाई सत्तेत असताना एक आणि विरोधात असताना एक बोलतात, असे आरोपही भाजप करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'आपल्याला सरकारमध्ये घ्या म्हणून विजय सरदेसाई हे कधीच भाजपकडे गेले नाहीत. उलट एका व्यक्तीला जेव्हा मुख्यमंत्री व्हायचे होते, तेव्हा तेच दिल्लीत येऊन सरदेसाई यांच्यापुढे भाजपला पाठिंबा देण्यासाठी आग्रही होते. याबाबतचे पुरावेदेखील आमच्याकडे आहेत. त्यामुळे यापुढे आमच्या पक्षावर किंवा पक्षप्रमुखांवर आरोप करताना सांभाळून बोलावे,' असा सज्जड इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख विकास भगत यांनी दिला.

पणजीत गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेस गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा प्रमुख दीपक कळंगुटकर व संतोषकुमार सावंत उपस्थित होते.

गोवा फॉरवर्डचे विकास भगत म्हणाले की, विजय सरदेसाई हे गेल्या काही महिन्यांपासून सरकारमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजप प्रवक्ता गिरीराज पै यांनी केला आहे. पण मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी नकार दिल्याने ते आले नाहीत असे ते सांगतात. मात्र या आरोपात काही तथ्य नाही, उलट भाजप आमच्याकडे पाठिंबा देण्यासाठी आग्रही होते. त्याचे पुरावेदेखील आहेत. जे स्वतः भाजपमध्ये पगारावर आहेत आणि ज्यांना अर्ज दाखल करताना आवश्यक असणारे दोन साक्षीदार मिळत नाहीत, निदान त्यांनी तरी सरदेसाईवर बोलण्याचे टाळावे.

भगत म्हणाले की, '२०२७ च्या निवडणुकांमध्ये आम्ही आमची क्षमता दाखवू, त्यासाठी आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. गिरीराज पै हे भाजपमध्ये येण्यापूर्वी फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नस (फॉग) अशी काहीतरी संस्था चालवायचे. त्यात ते अनेकांवर आरोप करायचे. पण ज्यांच्यावर आरोप करायचे, तेच आता भाजपमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत यावर पै यांनी आधी स्पष्टीकरण द्यावे व नंतरच आमच्या पक्षावर बोलावे.

विजय सरदेसाई सत्तेत असताना एक आणि विरोधात असताना एक बोलतात, असे आरोपही भाजप करीत आहे. पण भाजपने हे समजून घ्यावे की, सध्या आमचा एकच आमदार असला, तरी तो संपूर्ण राज्याचे विषय मांडत आहे. ही क्षमता इतर पक्षांकडे नाही.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण