शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस सुनिल गर्गची उच्च न्यायालयात धाव,  लाचखोरी प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 21:34 IST

लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा आदेश पणजी विशेष न्यायालयाने  दिल्यानंतर आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक  सुनील गर्ग यांनी या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान दिले आहे.

पणजी- लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा आदेश पणजी विशेष न्यायालयाने  दिल्यानंतर आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक  सुनील गर्ग यांनी या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान दिले आहे.  एफआयआर नोंदविण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागण्याच्या प्रकरणात गर्ग कॅमºयात टीपले गेले होते. विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर आपल्याविरुद्ध केव्हाही एसीबीकडून गुन्हा नोंदविला जाण्याची भिती असल्यामुळे त्यांनी खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणात त्यामुळे आता पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई होणर आहे. पहिल्या न्यायालयीन लढाईत निवाडा गर्ग यांच्या विरोधात गेला होता आणि राज्यात पहिल्यांदाच एका आयपीएस अधिकार्याविरुद्ध लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यात आला होता.  मुन्हालाल हलवाई नामक गृहस्थाने फोंडा पोलीस स्थानकात नोंदविलेली फसवणुकीची तक्रार गुन्हा म्हणून नोंदविण्यात आली नसल्यामुळे हलवाई यांनी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्याकडे मदतीची याचना केली होती. परंतु फोंडा पोलीसांना गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्या ऐवजी गर्ग  यांनी हलवाई यांच्याकडे त्यासाठी लाच मागितली असा हलवाई यांचा आरोप होता आणि ते सिद्ध करण्यासाठी त्याने व्हिडिओ फुटेजही सादर केली आहे. त्यात गर्ग यांना त्यांच्या आवाजासह टीपले गेले आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रारही नोंदविली होती आणि एसीबीच्या प्राथमिक तपासात या प्रकरणात भरपूर तथ्य असल्याचे आढळून आले होते. परंतु गुन्हा नोंदविण्यात न आल्यामुळे गर्ग यांनी न्यायालयात धाव घेतली होती. विशेष न्यायालयाच्या निवाड्याच्या रुपाने त्यांना फार मोठा दिलासा मिळाला होता.