शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस सुनील गर्गना खंडपीठाचा दिलासा, गुन्हा नोंदविण्याचा आदेश रद्दबातल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:51 IST

लाचखोरी प्रकरणात अडकलेले आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दिलासा दिला आहे.

 पणजी - लाचखोरी प्रकरणात अडकलेले आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश ‘सरकारकडून मंजुरी घेतली  नाही’ ह्या तांत्रिक मुद्यावरून रद्दबातल ठरविण्यात आला आहे. 

गोव्याचे पोलीस महानिरीक्षक म्हणून असलेले आयपीएस अधिकारी सुनिल गर्ग यांच्या विरुद्द गुन्हा नोंदविण्याच्या पणजी सत्र न्यायालयाच्या आदेशाला गर्ग यांनी खंडपिठात आव्हान दिले होते. या प्रकरणात अनेक सुनावण्या झाल्यानंतर बुधवारी खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरविला. तसेच याचिकाही निकालात काढली आहे.  गर्ग हे वरीष्ठ पोलीस अधिकारी अ सल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असते. भ्रष्टाचार विरोधी पथकाला (एसीबीला) तशी परवानगी मिळालेली नसल्यामुळे ते गुन्हा नोंदवू शकत नाहीत. सत्र न्यायालयाने निवाडा देताना हा मुद्दा विचारात घेतला नाही असा गर्ग यांच्या वकिलाचा युक्तिवाद होता. हा युक्तिवाद उचलून धरताना खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निवाडा रद्दबातल ठरविला. फसवणुकीचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी गर्ग याने लाच घेतल्याचा आरोप तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी केला होता व गर्ग यांच्याशी झालेल्या संभाषणाचे गुप्तपणे त्याने स्वत:च रेकॉर्डिंग केले होते. गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी एसीबीकडून सरकारची परवानगी मागितलेली होती परंतु ती सरकारने ती नाकारलेली नाही आणि दिलेलीही नाही. सरकारच्या या धोरणाची माहिती तक्रारदार  मुन्नालाल हलवाई यांनी खंडपीठाला दिली तेव्हा त्यांनी त्यासाठी वेगळी याचिका दाखल करण्याचे स्वातंत्र्य त्यांना असल्याचे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुन्नालाल यांनी त्यासाठी खंडपीठात नवीन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही याचिका स्विकारून खंडपीठाकडून सरकारला लवकर निर्णय घेण्याचा आदेशही जाऊ शकतो, परंतु खालच्या न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरविल्यामुळे तूर्त गर्ग यांना दिलाला मिळाला आहे. त्यांच्यावरील एफआयआरची टांगती तलवार तूर्त तरी बाजूला हटली गेली आहे.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय