शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

त्या स्कॅण्डलची चौकशी कराच; मुख्यमंत्र्यांना सत्य बाहेर आणण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 09:16 IST

खुर्चीवरून खाली उतरा चौकशीला सामोरे जा: तारा

पणजी : सेक्स स्कॅण्डलची मुळापासून चौकशी कराच, असे आव्हान प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले आहे.

काही विरोधक आपला आवाज क्लोन करून बोगस ऑडिओ क्लिप बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. त्यावर गिरीश यांनी वरील विधान केले आहे.

गिरीश यांनीच कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरण 'एक्स'वर पोस्ट करून उघडकीस आणले होते. मंत्री माविन यांच्या कार्यालयाने त्यानंतर वास्को पोलिसात तक्रारही केली होती.

चोडणकर म्हणाले की, 'सेक्स स्कँडलमध्ये कोण मंत्री गुंतला आहे, हे शोधणे पोलिसांचे काम होय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन सत्य काय ते उघडकीस आणावे. मी गृहमंत्री असतो, तर दोन दिवसांत प्रकरण धसास लावले असते. राज्य सरकार याबाबतीत उदासीनता दाखवत आहे.'

चोडणकर म्हणाले की, मंत्र्यांची कांडे बाहेर काढण्यासाठी कोणाचीही फूस असण्याची गरज नाही. सत्ताधाऱ्यांकडून ज्या काही गैर गोष्टी घडतात, त्या उघडकीस आणून, त्यावर आवाज उठविणे विरोधक म्हणून आमचे कर्तव्य आहे.'माविन यांनी असेही म्हटले होते की, आपल्या कार्यालयातून पोलिसात तक्रार केली, परंतु काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. गिरीश यांना याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, 'माविन सरकारात मंत्री आहेत. मग चौकशी करायला विलंब का? मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन सत्य काय ते लोकांसमोर आणावेच, असेही चोडणकर यांनी सांगितले. दरम्यान, या कथित सेक्स स्कँडलमुळे राज्याचे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे.

खुर्चीवरून खाली उतरा चौकशीला सामोरे जा: तारा

मला पोलिस स्थानकात न्या. मंत्र्याच्या सर्व भानगडी पोलिसांना सांगण्याची माझी तयारी आहे,' असे जाहीर विधान केलेल्या 'सवेरा' एनजीओच्या निमंत्रक तारा केरकर यांनीही मंत्री माविन गुदिन्हो यांना आव्हान दिले आहे. खुर्चीवरून खाली उतरा आणि चौकशीला सामोरे जा, असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, या प्रकरणात मुख्यमंत्री व सभापती यांच्याकडे मी सर्वप्रथम तक्रार केलेली आहे. सोशल मीडियावर टाकलेले फोटो मॉर्फ केलेले आहेत, हे मंत्र्यांनी सिद्ध करावे. या आधी मिलिंद नाईक, मिकी पाशेको यांचे अशाच प्रकरणांमध्ये राजीनामे घेतले. मग माविन यांनाच अभय का? असा सवाल केला. या प्रकरणी आवाज उठविण्याचे काम चालूच ठेवू, असे त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत