शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पकडला आंतराष्ट्रीय ड्रग डीलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 21:18 IST

जाओ पेद्रो डयुराटे हा ब्राझीलमध्ये अनेक गुन्हेगारी प्रकरणात अडकला असून अंमलीपदार्थांच्या तस्करीत त्याचा सहभाग आहे.

पणजी: आंतराष्ट्रीय ड्रग्स डीलर जाओ पेद्रो डुराटे ओलिवेरा सोऊ या ब्राझीलच्या गुन्हेगाराला गोव्यात विदेश विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. कडक सुरक्षेत त्याला म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले आहे. 

जाओ पेद्रो डयुराटे हा ब्राझीलमध्ये अनेक गुन्हेगारी प्रकरणात अडकला असून अंमलीपदार्थांच्या तस्करीत त्याचा सहभाग आहे. त्याला पकडण्यासाठी ब्राझीलने सर्वत्र रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. इन्टरपोलच्या माध्यमातून त्याचा शोधही सुरू होता. तो भारतात आल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विदेश विभागाला यासंबंधी सूचना आली होती. त्यात संशयिताच्या भारतातील वास्तव्याबद्दल माहिती होती. विविध माध्यमातून त्याच्या मागावर असलेल्या तपास यंत्रणांना तो गोव्यात दाखल झाल्याचे आढळून आले. त्याने गोव्यात केलेला एटीएम मशीन्सचा वापर, फोनचा वापर हे त्याचा पत्ता शोधण्याचा महत्त्वाचा धागा ठरला.

मुंबई विदेश विभागाच्या कार्यालयातून गोव्याला या संबंधी माहिती मिळाल्यानंतर गोवा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू केला. त्याला पकडण्यात यशही मिळाले. दरम्यान त्याला नेमके कुठे पकडण्यात आले या विषयी अद्याप विदेश विभागाकडून काहीच सांगण्यात आलेले नाही, परंतु उत्तर गोव्यात पकडले एवढे सांगण्यात आले आहे. पकडण्यात आल्यानंतर त्याला म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान जाओ पेद्रो ड्युराटे हा अत्यंत धोकादायक गुन्हेगार असल्यामुळे स्थानबद्धता केंद्रात ठेवलेले असतानाही त्याच्यावर करडी नजर ठेवण्याच्या सूचना केंद्राला देण्यात आल्या आहेत. त्याच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमऱ्यांचाही वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  दरम्यान तो पकडला गेला त्यावेळी त्याच्याकडे ब्राझीलचा पासपोर्ट आणि कालमर्यादा ओलांडलेले भारताचे व्हिसापत्र सापडले. त्याला पकडल्याची माहिती ब्राझील देशाला देण्यात आली आहे.