शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील बाल संगोपन केंद्रातील कारभाराची चौकशी करा: खंडपीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 22:29 IST

बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आलेली २५०० हून अधिक मुले ही कोणत्याही बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे.

पणजी: बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आलेली २५०० हून अधिक मुले ही कोणत्याही बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करताना चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या बाल संगोपन केंद्रात कोणीही मुले आणून ठेवावी आणि तिथे भरती करून घेतली जावी अशी परिस्थिती असून कसल्याच प्रकारचे ताळतंत्र नसल्याचे मुख्य सचिवांच्या अहवालावरून स्पष्ट झाले अहे. वास्तविक मुलांना संगोपन केंद्रात ठेवून घेण्यासाठी बाल कल्याण समितींची शिफारस हवी असते. गोव्यातील विविध बाल संगोपन केंद्रात मिळून अडीच हजाराहून अधिकमुलांना बाल कल्याण समितीच्या शिफारशीशिवाय ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडपीठाने या प्रकरणात मुख्य सचिवांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.या अहवालामुळे सरकारचे बालसंगोपन केंद्रांकडे लक्ष्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडपीठाने या प्रकरणात दखल घेतल्यामुळे अनेक बालसंगोपन केंद्रांमधील वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सावध होऊन एकूण ७८ पैकी १२ केंद्रांकडून नोंदणी रद्द करण्यासाठी बाल कल्याम समितीला पत्रे लिहिली आहेत. ७८ पैकी अवघ्या ५ ते ६ केंद्रांना सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे इतर केंद्रे चालतात तरी कशी असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला आहे.त्या मुलींचे काय झाले?बालसंगोपन केंद्रातून बाहेर पडलेल्या मुलींविषयी माहिती देण्याची सूचना खंडपीठाने सरकारला केली आहे. १८ वर्षे वयापर्यंतच या केंद्रात राहायला मिळते. त्यानंतर या मुले कुठे जातात काय करतात याची माहितीही देणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या मुलींना आतापर्यंत बालसंगोपन केद्रामध्ये ठेवण्यात आलेल्या व १८ वर्षे वय पूर्ण झाल्याने त्या अपनाघरमधून बाहेर पडल्या त्या आता कुठे आहेत त्याची माहिती देण्यात यावी असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा