शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

 होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनी गुंतवणूक करावी, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 20:30 IST

होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनीही गुंतवणूक करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे. ‘होमियोपॅथी औषध नियमन : जागतिक हातमिळवणी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. 

पणजी - होमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनीही गुंतवणूक करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले आहे.  ‘होमियोपॅथी औषध नियमन : जागतिक हातमिळवणी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. केंद्रीय आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव रोशन जग्गी, सेंट्रल कौन्सिल फॉर रीसर्च इन होमियोपॅथीचे (सीसीआरएच)डॉ. राज. के. मनचंदा, फ्रान्समधील इसीएचच्या अध्यक्षा डॉ. हेलेन रेनॉक्स, सीसीआरएचचे उप सरसंचालक डॉ. अनिल खुराना यावेळी उपस्थित होते. तीन दिवस ही आंतरराष्ट्रीय परिषद चालणार असून  होमियोपॅथी औषध क्षेत्रातील क्रांती, नियमन तसेच या क्षेत्रासमोर असलेली आव्हाने याबाबत व्यापक चर्चा या परिषदेत होणार आहे.  या परिषदेत २0 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून यात जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, अर्जेंटिना, आॅस्ट्रेलिया, जपान, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, श्रीलंका आदी राष्ट्रांचा समावेश आहे.

 मंत्री नाईक पुढे म्हणाले की, ‘ होमियोपॅथी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार कटिबध्द आहे आणि त्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. होमियोपॅथी डॉक्टरना तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी नजीकच्या काळात संसदेत कायदा दुरुस्त्या येणार आहेत. होमियोपॅथी औषधे प्रदर्शनात लावता येतील. विक्री खुली होईल. औषध विक्रेत्यांना ही औषधे विकण्यासाठी स्वतंत्र परवाना घ्यावा लागणार नाही.’

ते म्हणाले की,‘भारतात जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. अँटिबायोटिक्स औषधांमुळे आरोग्याला बाधा पोचत असल्याने लोक होमियोपॅथीकडे वळत असून पर्यायी उपचार पध्दती म्हणून ती लोकप्रिय ठरत आहे. संसर्गजन्य रोगही होमियोपॅथीने बरा होऊ शकतो.’

 २ लाख होमियोपॅथी डॉक्टर 

संयुक्त सचिव रोशन जग्गी म्हणाले की,‘ होमियोपॅथी उपचार पध्दतीमध्ये आता लोकांचा अधिकाधिक विश्वास निर्माण होत आहे आणि ही उपचारपध्दती लोकप्रियही होत आहे. भारतात सुमारे २ लाख नोंदणीकृत होमियोपॅथी डॉक्टर आहेत. सुमारे ६00 कंपन्या होमियोपॅथी औषधांचे उत्पादन करीत आहेत. हे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे त्यामुळे याचा अधिकाधिक वापर करुन या उपचार पध्दतीत नाविन्य आणायला हवे. होमियापॅथी उपचार आता पारंपरिक पध्दतीनेच करुन किंवा जो काही वारसा मिळाला आहे त्या पध्दतीनेच करुन चालणार नाही. या क्षेत्रापुढेही नवी आव्हाने आहेत. अधिकाधिक संशोधन व्हायला हवे आणि शास्रीय अधिष्ठानही लाभले पाहिजे. ही परिषद त्यादृष्टिने व्यापक चर्चेसाठी योग्य व्यासपीठ ठरेल.’

टॅग्स :goaगोवा