शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

गोव्यात मद्यनिर्मिती करणा-या उद्योगांना आता औद्यागिक वसाहतींमध्ये जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 13:48 IST

गोव्यात आता मद्यनिर्मिती करणा-या उद्योगांना औद्यागिक वसाहतींमध्ये जागा देण्याचा निर्णय औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे.

पणजी : गोव्यात आता मद्यनिर्मिती करणा-या उद्योगांना औद्यागिक वसाहतींमध्ये जागा देण्याचा निर्णय औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. भूखंड हस्तांतर आणि भाडेपट्टीवर देण्याच्याबाबतीत नव्या नियमांना अनुसरुन या गोष्टीला हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. या निर्णयाचे राज्यातील मद्य व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. मांडवी डिस्टिलरीजचे श्रीधर रेड्डी म्हणाले की, मद्य उद्योगाकडून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. उद्योगाच्या विस्तारासाठी जमीन मिळणे कठीण जात होते. ही अडचण आता दूर झालेली आहे. गोवा चेंबर आॅफ कॉमर्सच्या सूत्रांनीही मद्य उद्योग महसूल निर्माण करणारा असल्याने तसेच पर्यटनपूरक असल्याने सरकारने या उद्योगांना सवलती द्यायला हव्यात, असे म्हटले आहे.

राज्यात सुमारे ६0 डिस्टिलरी१४ सप्टेंबर रोजी महामंडळाने नवे नियम निश्चित केले. या नियमांनुसार यापुढे मद्य निर्मिती करणा-या उद्योगांना औद्योगिक वसाहतींमध्ये प्रतिबंध केला जाणार नाही. भूखंडासाठी मद्य व्यावसायिक अर्ज करू शकतात. राज्यात सुमारे ६0 डिस्टिलरी आहेत आणि वर्षाकाठी सुमारे ५00 लाख लिटर मद्यनिर्मिती येथे होते. अनेक स्थानिक डिस्टिलरी मोठ्या प्रमाणात निर्यातही करतात. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेल्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे सुमारे २00 कोटी रुपये गुंतवणुकीचे पाच प्रस्ताव आहेत. यात वाणी अ‍ॅग्रो प्रोजेक्ट, आरबोर ब्रिवरीज व वेल्हो मायक्रोब्रिव या कंपन्यांचा समावेश आहे.