शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडी राज्यात व देशात शेतकऱ्यांना भडकवते; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By वासुदेव.पागी | Updated: July 29, 2024 15:03 IST

आमदार निलेश काब्राल यांनी शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुन्यतासात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडला होता.

पणजीः शेतकऱ्यांना समजावून सांगण्या ऐवजी त्यांना भडकावण्याचे काम इंडिया आघाडी गोव्यात आणि देशातही क रीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केला. पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले.

आमदार निलेश काब्राल यांनी शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा शुन्यतासात लक्ष्यवेधी सूचनेद्वारे मांडला होता. शेतकऱ्यांना पावसामुळे खूपच नुकसान झाले असून त्यात काकड्या, मिर्ची, भाजी, या सह इतर उत्पादकांची पिके नष्ट झाल्याचे निलेश काब्राल आणि इतर आमदारांनी सभागृहाच्या लक्षात आणून देण्यात आले.  दिगंबर कामत, विजय सरदेसाई, आंतोन वाज यांनीही आपल्या मतदारसंघातही अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले. खुद्द सभापती रमेश तवडकर यांनीही ही परिस्थिती सर्वत्र असल्याचे सांगितले.

त्यावर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगितले. तसेच कृषी अधिकाऱ्यांना या संबंधी. पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. त्यावर युरी आलेमाव यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षाची नुकसान भरपाईच मिळाली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षाची नुकसान भरपाई दोन दिवसात वितरीत करण्यात येणार असस्याचे सांगितले.

हे सांगतानाच त्यांनी आमदारांना उद्देशून सांगितले की विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांना समजावून सांगावे. त्यांना भडकावू नये. इंडिया आघाडी गोव्यात आणि देशभर शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम करीत आहे असेही ते म्हणाले. यावर विरोधकही खवळले विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी राहुल गांधी देशभर शेतकऱ्यांना भेटून तुमच्या सरकारमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. आपचे आमदार वेन्झी विएगशहनेही मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका केली,