शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तारांकित हॉटेलांना वाढीव एफएआर

By admin | Updated: January 30, 2015 01:26 IST

२0 टक्के अतिरिक्त चटई निर्देशांक : सरकारच्या प्रस्तावाने खळबळ; हॉटेल लॉबीसाठी खटाटोप होत असल्याचा आरोप

पणजी : चार आणि पंच तारांकित हॉटेलांना बांधकामासाठी अतिरिक्त २0 टक्के चटई निर्देशांक (एफएआर) वाढवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी नगर नियोजन खात्याने २0१0च्या गोवा भू विकास व बांधकाम नियमांमध्ये दुरुस्ती सुचविणाऱ्या मसुद्याची अधिसूचना जारी केली असून याबाबतीत जनतेकडून ३0 दिवसांच्या आत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. नियमात सुचविलेल्या दुरुस्त्यांमुळे खळबळ माजली आहे. हॉटेल लॉबीच्या सोयीसाठी हा खटाटोप असल्याचा आरोप सरकारवर होत आहे. मुख्य नगर नियोजक एस. टी. पुत्तुराजू यांच्या सहीने जारी झालेल्या या मसुद्यात २0१0च्या भू विकास व बांधकाम नियम ६ अ ४मध्ये दुरुस्ती करताना नवे कलम घुसडण्यात आले असून या अन्वये चार आणि पंच तारांकित हॉटेलांना नगर नियोजन सचिवांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीच्या शिफारशीवर बांधकामासाठी अतिरिक्त २0 टक्के एफएआर देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच बांधकामाची उंची, सेट बॅक (बांधकामाच्या बाबतीत ठेवायचे अंतर) याबाबतीतही शिथिलता देण्याची तरतूद आहे. नगर नियोजन सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती पाच सदस्यीय असेल आणि त्यात टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष, पर्यटन खात्याचे संचालक, अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र या विषयातील सरकारनियुक्त तज्ज्ञ प्रतिनिधी आणि मुख्य नगर नियोजक यांचा सदस्य म्हणून समावेश असेल. चार व त्यापुढील तारांकित हॉटेलांना वरील सवलत देताना शैक्षणिक संस्था तसेच आदिवासींच्या घरांनाही एफएआरच्या बाबतीत शिथिलता देण्याची तरतूद आहे. कृषी प्रकल्पांनाही एफएआर सवलत कृषी प्रकल्पांसाठीही एफएआरमध्ये वाढ करण्याची तरतूद या मसुद्यात आहे. त्यानुसार फलोत्पादन आणि पुष्पोत्पादनासाठी किमान ५00 चौरस मीटर आणि कमाल ४ हजार चौरस मीटर जमिनीत प्लास्टिक किंवा लाकडी बांधकामासाठी भूखंडाच्या ५0 टक्क्यांपर्यंत, कृषिविषयक ग्रेडिंग व पॅकिंग युनिटसाठी हंगामी किंवा कायम बांधकामासाठी ५ टक्के, प्राथमिक प्रक्रिया, तसेच प्री कुलिंग युनिटसाठी किमान २00 चौरस मीटर भूखंडासाठी ५ टक्के, शीतगृहासाठी १५ टक्क्यांपर्यंत, अळंबी उत्पादन युनिटसाठी ३0 टक्क्यांपर्यंत, पंप हाउससाठी ३0 चौरस मीटरपर्यंत तर डेअरी, पोल्ट्री, डुक्कर पालनासाठी भूखंडाच्या २0 टक्क्यांपर्यंत एफएआर देण्याची तरतूद आहे. (प्रतिनिधी)