शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धरणांच्या पातळीत वाढ

By admin | Updated: July 21, 2016 02:17 IST

पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे

पणजी : राज्यात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावलीचे धरण भरण्यास केवळ ५0 ते ६0 सेंटीमीटर बाकी आहे. पाऊस अखंड चालू राहिल्यास आज, गुरुवारी हे धरण भरून पाणी ओसंडून वाहू शकते. मात्र, त्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने धरण भरले तरी त्यापासून परिसरास धोका नाही, असे जलस्रोत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केवळ अंजुणे धरणाच्या बाबतीत पाण्याची पातळी वाढली की दरवाजे मात्र उघडावे लागतात. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अंजुणे धरण वगळता इतर धरणांच्या बाबतीत ती भरली की पाण्याचा विसर्ग आपोआप होतो त्यामुळे कोणताही धोका नाही. अंजुणे धरण भरण्यासाठी अजून साडेआठ मीटर पातळी बाकी आहे. असाच पाऊस सलग १५ ते २0 दिवस कोसळत राहिला तरच ही स्थिती उद्भवेल. बुधवारी दुपारी साळावली धरणातील पाण्याची पातळी ४0.३५ मीटर होती. साधारणपणे ४१.१५ मीटरपर्यंत ती पोहोचली की धरण भरून पाणी बाहेर वाहू लागते. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २0 जुलै रोजी साळावलीतील पाण्याची पातळी ३९.८५ मीटर होती. आमठाणे धरणाच्या बाबतीत तेथील क निष्ठ अभियंता के. पी. नाईक म्हणाले की, या धरणाची क्षमता ५0 मीटर पातळीची आहे. बुधवारी पाण्याची पातळी ४८.६५ मीटर होती. हे धरण भरण्यास १.३५ मीटर बाकी आहे; परंतु ते एवढ्यात भरणे शक्य नाही; कारण धरणाच्या वरच्या भागात व्याप्ती मोठी असते. आठ ते दहा दिवस अव्याहत पाऊस कोसळला तर ते पाणी ओसंडून वाहू लागेल. मात्र, पाण्याचा विसर्ग आपोआप होत असल्याने या धरणापासूनही धोका नाही. (प्रतिनिधी)