शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आमदारांचे भत्ते वाढवणार, भ्रष्टाचारासाठी कारण नको - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 13:36 IST

गोव्यातील सगळे आमदार तणावाखाली आहेत. हा ताण देणग्यांचा आहे. समाजातील प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना देणगी द्यावी लागते. यामुळे आपले सरकार लवकरच आमदारांचे विविध भत्ते वाढवणार आहे असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले

पणजी - गोव्यातील सगळे आमदार तणावाखाली आहेत. हा ताण देणग्यांचा आहे. समाजातील प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना देणगी द्यावी लागते. यामुळे आपले सरकार लवकरच आमदारांचे विविध भत्ते वाढवणार आहे असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले. आमदारांना मग भ्रष्टाचार करण्यासाठी कारण मिळणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याने गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या ससहकार्याने आयोजित केलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

पर्रीकर म्हणाले की भत्ते वाढविल्यानंतर आमदारांचा भ्रष्टाचार थांबणार असे आपण म्हणत नाही पण निदान त्यांना तसे कारण तरी देता येणार नाही. आता त्यांच्यावर ताण आहे. माझ्याकडे देखील देणग्यांसाठी लोक येतात. आम्ही आमदारांचे वेतन वाढविल्यानंतर प्रसारमाध्यमे  आमच्यावर टीका करतात पण त्यांनी आमदारांना ज्या स्थितीला सामोरे जावे लागते त्याचाही विचार करावा.

सहा वर्षांपूर्वी गोव्यातील सर्व आमदारांचे वेतन सरकारने वाढविले होते. सहा वर्षांत जशी महागाई वाढली आहे, त्या महागाईच्या तुलनेत आमदारांना वेतनवाढ दिली जाईल असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी या सोहळ्यानंतरही पत्रकारांना तपशीलाने सांगितले. त्यासाठी येत्या डिसेंबरमध्येच विधेयक अधिवेशनात मांडले जायला हवे असे मात्र काही  नाही असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नादाखल सांगितले.

प्रसारमाध्यमांनी बातमी देताना त्या बातमीत स्वत:ची मते घुसडवू नये. मी काहीवेळा पत्रकारांवर चिडतो. माझी भाषा काहीवेळा  तिखट असते पण पत्रकारांनी माझ्यावर टीकात्मक लेखन करताना दबाव घेऊ नये. माझ्या विरोधात किवा माझ्या भूमिकेविरोधात लिहिले गेलेले लेखनही मी वाचत असतो. मात्र प्रसार माध्यमांवर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याबाबतही मी मागे राहत नाही असे मुख्यमंत्री भाषणात म्हणाले. प्रसार माध्यमांनी राजकारणाला दिशा देताना विधायक भूमिका पार पाडावी. सगळे काही नकारात्मकच छापण्याची स्पर्धा करू नये.

सरकारने गोव्यात पत्रकारांच्या कल्याणासाठी  कर्तव्य भावनेने अनेक योजना आणल्या. त्याबाबत मला श्रेय नको आहे. कारण मी काही माझ्या खिशातून त्यासाठी पैसे खर्च केलेले नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान लोकमतचे छायापत्रकार गणेश शेटकर व इतरांना या सोहळ्यावेळी पुरस्कार देऊन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर