शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

'अपघात घडताच दहा मिनिटांत पोहचा', गोव्यात 20 दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 12:50 IST

आरोग्य खात्यातर्फे गुरुवारी एकूण 20 दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले.

पणजी : राज्यात कुठेही अपघात घडल्यानंतर जखमींपर्यंत दहा मिनिटांत पोहचता यावे व त्यास प्रथमोपचार देण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आरोग्य खात्यातर्फे गुरुवारी एकूण 20 दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. येत्या वर्षी अशा प्रकारच्या शंभर रुग्णवाहिका गोव्यातील रस्त्यांवरून धावतील एवढी व्यवस्था केली जाईल असे सरकारतर्फे उद्घाटन सोहळ्य़ानंतर जाहीर करण्यात आले.ईएमआरआर 108 रुग्णवाहिका सेवेखाली गोव्यातील रस्त्यांवरून रुग्णवाहिका धावतातच. त्या शिवाय आता 108 सेवेखालीच वीस दुचाकी रुग्णवाहिकाही रस्त्यावरून धावण्यास गुरुवारी आरंभ झाला.  फस्ट रिस्पॉन्स  रुग्णवाहिका म्हणून त्या ओळखल्या जातात. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या आधुनिक पद्धतीच्या दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. पर्वरी येथील सचिवालयाजवळ उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. दुचाकी रुग्णवाहिकांकडे ऑक्सिजन मास्क, ऑक्सिजन सिलिंडर व अन्य प्राथमिक उपकरणे आहेत. एखाद्या अपघातग्रस्ताला दहा मिनिटांत प्रथमोपचार देता यावेत अशी व्यवस्था केली गेली आहे. केवळ वीस रुग्णवाहिका पूर्ण गोव्यासाठी पुरेशा नाहीत. उसगावमधील एका कंपनीही आणखी 25 दुचाकी रुग्णवाहिका पुरस्कृत करणार आहे. एकूण शंभर दुचाकी येत्या वर्षी गोव्यातील रस्त्यांवरून धावतील असे जाहीर करण्यात आले. आरोग्य खात्याचे तसेच ईएमआरआर सेवेचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून व हिरवा बावटा दाखवून दुचाकी रुग्णवाहिकांचे उद्घाटन केले गेले.एका दुचाकी रुग्णवाहिकेच्या खरेदीसाठी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. दुचाकीस्वारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुचाकीवरून रुग्णाला आणले जाणार नाही पण प्रथमोपचार तातडीने मिळाल्यानंतचार चाकी रुग्णवाहिकांमध्ये घालून रुग्णाला इस्पितळात नेले जाईल. मुख्यमंत्री र्पीकर म्हणाले, की वाहतूक कोंडीची समस्या, अरुंद रस्ते तसेच अन्य समस्यांवर मात करत दुचाकी रुग्णवाहिका अपघातग्रस्त रुग्णार्पयत लवकर पोहचतील. मोठय़ा रुग्णवाहिकांना पोहचण्यास काहीवेळा विलंब लागतो. तोर्पयत दुचाकी घटनास्थळी पोहचतील. केवळ किनारी भागातच नव्हे तर सगळीकडेच दुचाकी रुग्णवाहिकांची गरज असते. जिथे जास्त अपघात होतात अशा ठिकाणी प्रथम दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जातील.दरम्यान, हृदयरोगविषयक उपचारांची व्यवस्था असलेल्या पाच विशेष रुग्णवाहिकाही तयार करण्यात आल्या आहेत. येत्या तीन दिवसांत त्यांचेही उद्घाटन केले जाणार आहे. पाच विशेष रुग्णवाहिकांवर प्रत्येकी एक डॉक्टर उपलब्ध असेल. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्या रुग्णार्पयत ह्या रुग्णवाहिका पोहचतील. त्यास प्रथमोपचार दिले जातील व मग इस्पितळात नेले जाईल. प्रथमोपचारांअभावी काहीवेळा रुग्ण इस्पितळात पोहचण्यापूर्वीच मरण पावत असतात. 

टॅग्स :goaगोवा