शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यामध्ये शिवगोमंतगाथा रथयात्रेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 15:22 IST

लहान वयातच शिवाजी महाराजांनी सैन्य उभे केले. त्यांना रामदास स्वामीं गुरू लाभले. गनिमी कावा युद्धनीतीचा वापर करून त्यांनी अनेक किल्ले काबिज केले. गोमंतकातील कोलवाळसारख्या भागाला शिवाजी महाराजांचे पाय लागले.

म्हापसा : लहान वयातच शिवाजी महाराजांनी सैन्य उभे केले. त्यांना रामदास स्वामीं गुरू लाभले. गनिमी कावा युद्धनीतीचा वापर करून त्यांनी अनेक किल्ले काबिज केले. गोमंतकातील कोलवाळसारख्या भागाला शिवाजी महाराजांचे पाय लागले. म्हणूनच शिवगोमंतगाथा रथयात्रेचा कोलवाळ मधून  प्रारंभ करण्यात येत आहे. ही आनंतवार्ता असल्याचे माजी पर्यटनमंत्री तथा थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी उद्गार काढले. 

गोमंतक मराठी अकादमी आणि रवींद्र भवन साखळीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोमंतकातील आगमनाच्या 350व्या वर्षानिमित्त गोमंतशिवगाथा या शिवचरित्र संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी सकाळी १० वाजता कोलवाळ श्रीराम मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलीत करून आमदार हळर्णकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या व्यासपीठावर माजी सभापती तथा या संमेलनाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आर्लेकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, कोलवाळ पंचायतचे सरपंच दशरथ बिचोलकर, उपसरपंच रितेश वारखंडकर, पंचसदस्य बाबनी साळगावकर, देवस्थानचे व्यवस्थापक महाबळेश्वर चोडणकर उपस्थित होते. 

स्वागतपर भाषणात राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले की, १९ नोव्हेंबर १९६७ मध्ये पोर्तुगीजांच्या हातून शिवाजी महाराजांनी  कोलवाळमधील किल्ला काबीज केला. या ठिकाणी ते दोन दिवस वास्तव्य करून राहिले. तर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेल्या कोलवाळ येथील किल्ल्याचे जतन करावे असे आवाहन सरकारला करून त्यांनी दोन दिवसात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. यावेळी सरपंच दशरथ बिचोलकर, उपसरपंच रितेश वारखंडकर यांनी आपली मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार तुषार टोपले यांनी मानले. त्यानंतर शिवगोमंतगाथा रथाची मिरवणूक काढण्यात आली. ती कोलवाळ किल्ल्याकडून अस्रोडा, डिचोलीहून साखळीकडे प्रयाण केले.