शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात चौथ्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 20:17 IST

चौथ्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी दिल्लीतील विज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पराशर यांच्या हस्ते झाले येथे झाले. चार दिवस हा महोत्सव चालणार असून वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थाचे दुर्मिळ प्रदर्शनही या ठिकाणी भरविण्यात आले आहे. 

पणजी : चौथ्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी दिल्लीतील विज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पराशर यांच्या हस्ते झाले येथे झाले. चार दिवस हा महोत्सव चालणार असून वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थाचे दुर्मिळ प्रदर्शनही या ठिकाणी भरविण्यात आले आहे. 

येथील आयनॉक्स आणि माकिनिझ पॅलेसमध्ये हा चित्रपट महोत्सव भरवण्यात आला आहे. ‘परमाणू’ हा उद्घाटनाचा चित्रपट होता. विज्ञानाधारित प्रदर्शन तसेच टेलेस्कोप बनविण्याच्या कार्यशाळेचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. विज्ञानावर आधारित ९ फिचर फिल्म व ३0 लघुपट तसेच माहितीपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येतील. देशभरातील ६0 वैज्ञानिक तसेच संशोधक यात सहभागी होतील. ‘फ्युचर ऑफ दि ओशियन’, ‘टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड इनोव्हेशन’ आणि ‘बेसिक सायन्सेस’ या तीन संकल्पनांवर यंदाचा हा विज्ञान चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. विज्ञान शिक्षक तसेच टेलेस्कोप कार्यशाळा आणि प्रदर्शनाचाही यात समावेश आहे. 

या प्रसंगी बोलताना पराशर म्हणाले की, ‘या महोत्सवाला प्रतिसाद पाहता पुढील काळात यापेक्षाही मोठा महोत्सव आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स, एनआयओचे संचालक डॉ. सुनिलकुमार सिंह, शेखर सरदेसाई, जयंतराव सहस्रबुध्दे, प्रा. सुहास गोडसे, अभय भामईकर हे यावेळी उपस्थित होते.

गोव्यात हा विज्ञान चित्रपट महोत्सव झपाट्याने पुढे जात असल्याचे जिल्हाधिकारी मार्टिन्स म्हणाले. डॉ. सुनिलकुमार सिंह म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांनाही विज्ञान समजले पाहिजे. त्यासाठी ते सोपे करुन सांगायला हवे.’

१२८ शैक्षणिक संस्थांनी या महोत्सवात भाग घेतला आहे त्यात १२५ गोव्यातील आणि ३ महाराष्ट्रातील आहेत. विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, परिसंवाद, चित्रपट प्रदर्शन आदी गोष्टी होतील. आघाडीचे शास्रज्ञ डॉ, शेखर मांडे, प्रा. शर्मिष्ठा बॅनर्जी, डॉ. अरविंद रानडे, डॉ, सुमित मिश्रा आदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. 

एनआयओ, भारतीय कृषी अनुसंसाधन केंद्र, गोवा राज्य इनोवेशन कौन्सिल, विक्रम साराभाई स्पेस एक्झीबिशन, कैगा अणु ऊर्जा केंद्र, नॅशनल सेंटर फॉर पोलर अ‍ॅण्ड ओशन रीसर्च या संस्थांनी प्रदर्शनात भाग घेतला आहे. 

१८ रोजी विज्ञान शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतली जाईल. १९ रोजी समारोप सोहळ्याला पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम् हे प्रमुख पाहुणे असतील. ‘भारतीय अणु कार्यक्रम-विकसनशील जगासाठी आदर्श’ या विषयावर ते व्याख्यान देतील.