शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सापळा लावला ब्लॅक पॅंथरसाठी अडकला मात्र बिबट्या 

By आप्पा बुवा | Updated: November 19, 2023 16:07 IST

वन खात्याने लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र तो चर्चेचा विषय झाला आहे.

अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: मागच्या काही दिवसात वंडाळा धारबांदोडा येथे ब्लॅक पॅंथरच आढळून आल्याने वन खात्याने त्याला पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात एक बिबट्या आढळून आल्याने सर्वत्र तो चर्चेचा विषय झाला आहे.

सविस्तर वृत्तानुसार वांड्याळ धारबांदोडा येथील अतुल नाईक यांच्या घराच्या परिसरात एक ब्लॅक पॅंथर आढळून आला होता. परिसरातील कुत्री अचानक नाहीशी होत असल्याने, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्रीच्या वेळेस तिथे ब्लॅक पॅंथरचा संचार असल्याचे आढळून आले होते. या संबंधी वन खात्याला माहिती देण्यात आल्यानंतर वन खात्याने ब्लॅक पॅंथरला पकडण्यासाठी सापळा लावला होता. त्याचबरोबर त्याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले होते. त्या परिसरात ब्लॅक पॅंथर बरोबरच आणखीन एक बिबट्या असल्याचा सुद्धा संशय नागरिक व्यक्त करत होते. त्या दृष्टीने सुद्धा वनखात्याचे अधिकारी प्रयत्न करत होते.

रविवारी पहाटे तीन वाजता ब्लॅक पॅंथर साठी लावलेल्या सापळ्या मधून वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकू येतात स्थानिकांनी तिकडे जाऊन पाहणी केले असता तेथे बिबट्या अडकलेला आढळून आला. लगेचच सदरची माहिती वनखात्याला देण्यात आली.  सदर बिबट्याला आरोग्य तपासणी करण्यासाठी बोंडला अभयारण्यात घेऊन गेले आलेत.

दरम्यान ब्लॅक पॅंथरणे वांड्याळ परिसर सोडून तळसाय परिसरात कुच केल्याचे पुरावे मिळत आहेत. वन खात्याने त्याला पकडण्यासाठी सुद्धा उपाययोजना सुरू ठेवल्या आहेत.

टॅग्स :goaगोवाleopardबिबट्या