शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदाची मागणी करत सावर्डे मतदार संघातील सरपंच पोहोचले मुख्यमंत्र्यांकडे

By आप्पा बुवा | Updated: June 17, 2024 17:16 IST

साखळी येथील मंदिर रवींद्र भावनात सोमवारी सहाही पंचायतीचे सरपंच, काही उपसरपंच व मोठ्या संख्येने पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.

अप्पा बुवा,फोंडा: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सावर्डे मतदार संघातून दक्षिण गोव्यातील सर्वाधिक मताधिक्य दिल्याबद्दल पोच पावती म्हणून सावर्डे मतदार संघाचे आमदार गणेश गावकर यांना मंत्रिपद देण्याची मागणी मतदार संघातील सरपंचांनी केली आहे. साखळी येथील मंदिर रवींद्र भावनात सोमवारी सहाही पंचायतीचे सरपंच, काही उपसरपंच व मोठ्या संख्येने पंच सदस्य यावेळी उपस्थित होते. सावर्डे भाजप मंडळातील काही प्रमुख पदाधिकारी सुद्धा सरपंच यांच्या बरोबर ही मागणी घेऊन गेले होते.

लोकसभा निवडणुकी वेळी आमदार गणेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी कसे काम केले याची माहिती यावेळी सावर्डे मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. मागची अनेक वर्षे सावर्डे मतदार संघ भाजपच्या मागे खंबीरपणे उभा राहत आहे असे असतानाही इथे मंत्रीपदाच्या बाबतीत मेहरनजर होत नाही असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.विनय तेंडुलकर नंतर या मतदारसंघाला  भाजपच्या मुशीत तयार झालेला मंत्री मिळालेला नाही. काही वर्षे दीपक पावसकर हे मंत्री होते परंतु ते मगो मधून नंतर भाजपमध्ये आले होते. हे सर्व मुद्दे सरपंचाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना पटवून दिले.

त्यांचे सर्व निवेदन ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढली. आमदार गणेश गावकर यांना भविष्यात नक्की मंत्रीपद मिळेल असा सकारात्मक प्रतिसाद सुद्धा त्यांनी शिष्टमंडळाला दिला.

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालPramod Sawantप्रमोद सावंत