शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळ्यातील आरोपी इम्रानची एकाच बँकेत ५३० खाती, लुटीचा पैसा लपविण्यासाठी नवे तंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 21:28 IST

पणजी: बेकायदेशीरपणे खनिज उद्योग करणारा इम्रान खान याने आपली घोटाळ्यातील १०० कोटी रुपयांहून अधिक लूट लपविण्यासाठी मडगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एकाच शाखेत ५३० खाती खोलली होती.

पणजी: बेकायदेशीरपणे खनिज उद्योग करणारा इम्रान खान याने आपली घोटाळ्यातील १०० कोटी रुपयांहून अधिक लूट लपविण्यासाठी मडगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एकाच शाखेत ५३० खाती खोलली होती. एसआटीपासून लपविण्यासाठी रक्कम एका खात्यातून काढून दुस-या खात्यात टाकण्याचे काम तो सातत्याने करीत होता.बेकायदेशीर खाण घोटाळ्यात अडकलेल्या इम्रान खानच्या १०० कोटी रुपयांहून अधिक कायम ठेवी असल्याचे एसआयटीच्या छाप्यातून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांतून उघड झाले होती. कायम ठेवीच्या रुपात त्यांनी हे पैसे मडगावच्या बँकेत ठेवले होते. त्या पैकी ६० कोटी रुपयांच्या ठेवी गोठविण्यासाठी एसआयटीला यश आले आहे. ऊर्वरीत पैशांचाही पत्ता लावण्याच्या प्रयत्नात एसआयटी आहे. तपासादरम्यान इम्रानने ५३० खाती बँकेत खोलली होती. एका खात्यातून दुस-या खात्यात पैसे हलविण्याचे काम सायीप्राणे तो करीतच होता अशी माहिती एसआयटीच्या सूत्रांकडून देण्यात आली.एरव्ही एकाच बँकेत एक खाते असताना त्याच बँकेत दुसरे खोलायचे असल्यास बँक अधिका-यांकडून १०० प्रश्नांचा भडिमार केला जातो. तसे करूनही दुसरे खाते खोलले जाणारच याचा भरवसा नसतो. इथे तर इम्रानकडून ५३० खाती खोलली आहेत. म्हणजेच केवळ बँकेचा फायदा होतो या एकमेव कारणासाठी बँकेने त्याला खाती खोलून दिली. बँक अधिका-यांचे हे व्यवहार संशयाच्या घे-यात आले असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.इम्रानने बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर खनिज मालाचे उत्खनन करून त्याची विक्री करण्यात आल्याचे उघडकीस आल्यामुळे एसआयटीकडून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पणजी सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणात इम्रानविरुद्ध भक्कम पुरावे सापडल्याचा एसआयटीचा दावा आहे. मारिया फिगेरिडो यांना मंजूर झालेले टीसी क्रमांक ६५/५१ चे खाणलीज हा इम्रान खान चालवित होता. त्याच्याकडून पावर आॅफ एटर्नी त्याने घेतली होती. २००७-२०१२ या काळात त्याने कोट्यवधी रुपये किंमतीच्या खनिज मालाचे उत्खनन करून त्याची निर्यात केल्याचा एसआयटीचा दावा आहे.

टॅग्स :goaगोवा