शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 20:00 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी सायंकाळी मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी सायंकाळी मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. तत्पूर्वी भाजपाचे संघटन मंत्री सतिश धोंड हेही स्वतंत्रपणे मनोहर पर्रीकर यांना भेटले व त्यांनी काही विषयांबाबत चर्चा केली.मनोहर पर्रीकर यांना बुधवारी अस्वस्थ वाटत होते. त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी गोव्यात चर्चा आणि चिंता पसरली होती. याच पार्श्वभूमीवर सरकार अस्थिर होत असल्याचीही चर्चा पसरली होती. विरोधी काँग्रेस पक्षाचे या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष होते.प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई  यांनी शनिवारी सायंकाळी मनोहर पर्रीकर यांचे दोनापावल येथील खासगी निवासस्थान गाठले. ते अर्धा तास मुख्यमंत्र्यांसोबत बोलले. सरदेसाई म्हणाले की, 'मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीविषयी बाहेर जेवढे बोलले जाते, तशी स्थिती वाईट नाही. मी स्वत: भेटल्याने मला कल्पना आली. ते ठिक आहेत. मी मनोहर पर्रीकरांशी राजकीय विषयाबाबत चर्चा केली नाही. मडगावमधील विकास कामांविषयीही मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलणी केली व माघारी परतलो. त्यांच्या प्रकृतीविषयी चिंतेचे मला कारण दिसत नाही.'दरम्यान, सतिश धोंड हेही मनोहर पर्रीकर यांना भेटून आले. धोंड व मनोहर पर्रीकर यांच्यातील चर्चा मात्र कळू शकली नाही. सरदेसाई यांनी आपल्या काही शंकांचे मनोहर पर्रीकर यांच्याकडून निरसन करून घेतल्याची माहिती मिळते.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा