शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फीत शाहीद कपूर, कॅटरिना कैफ सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 19:22 IST

पणजी: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याच्या सोबतच यंदा ४८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री कॅटरिना कैफ या उपस्थित राहणार आहेत.

पणजी: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याच्या सोबतच यंदा ४८व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री कॅटरिना कैफ या उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, सुशांत सिंग राजपूत तसेच मराठी चित्रपट उद्योगातील कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली.ईएसजी समोरील परिसरात इफ्फी नॅक्स्ट जॅन अ‍ॅट बायोस्कोप व्हीलेजचे (चित्रपट नगरी)उद्घाटन दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रद्धा कपूर यांच्या हस्ते होईल. उद्घाटनानंतर ७.३० वा. येथील तीनही सिनेमागृहामध्ये त्यांचा आशिकी २ हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल, असे तालक यांनी सांगितले. युवा आदर्श म्हणून श्रद्धा कपूर यांचा या वेळी गौरव करण्यात येईल.कट्टा येथील संवादामध्ये अभिनेता नाना पाटेकर, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, सुशांत सिंग राजपूत, सई ताम्हणकर आदी मान्यवर सहभागी होईल. २५ व २६ रोजी मुलांसाठीचे चित्रपट प्रदर्शित केले जाईल. २६ रोजी एम एस धोनी हा चित्रपट शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित केला जाणार असून या वेळी या चित्रपटाचे अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांच्याबरोबर चर्चा करण्याची संधी मुलांना मिळणार असल्याची तालक यांनी माहिती दिली.इफ्फी जेन नॅक्स्ट उपक्रमांमध्ये नविन चित्रपट निर्मात्यांसाठी ३ मिनीटांचे इफ्फीवर आधारीत इफ्फी नेवर सीन बिफोर संकल्पनेवर आधारित लघुपट तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली असून यासाठी दर दिवसाचा विजेता व एक विजेता जाहिर संपूर्ण स्पर्धेचा केला जाईल. या स्पर्धेत प्रत्येक व्यक्तीला दिवसाला एकच प्रवेश दिला जाईल.बायोस्कोप व्हीलेजचा आनंद घेण्यासाठी दिवसाला ५० रू. प्रवेश शुल्क आकारले जाईल. ५० रू. मध्ये दिवसभरासाठी या विविध उपक्रमांचा आनंद घेता येईल असे तालक यांनी सांगितले. २१ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजे पर्यंत तर २२ ते २७ दरम्यान दुपारी १२ ते रात्री १२ वाजे पर्यंत बायोस्कोप व्हिलेज खुली राहील. २७ रोजी सायंकाळी ६ वाजता बायोस्कोप व्हीलेजचा समारोप सोहळा होईल या वेळी देखील दिग्गज कलाकार उपस्थित राहतील असे तालक यांनी सांगितले.यंदा मराठी भाषेतील ९ चित्रपट इंडियन पॅनोरामा विभागात निवडले असून ही ऐतिहासिक गोष्ट आहे. तेव्हा एक चित्रपट बाहेर मारल्यामुळे निराश होण्याची गरज नाही असे सध्या ज्युरींचे राजिमाना सत्र सुरू असल्याविषयी प्रश्न विचारला तेव्हा तालक यांनी सांगितले.सात हजार प्रतिनिधी नोंद -आता पर्यंत इफ्फीसाठी ७१९१ प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. यातील ३९५२ प्रतिनिधींनी शुल्क दिले आहे. आता नोंदणी करणा-या प्रतिनिधींना उशिराचे शुल्क भरावे लागतील. मागच्या वर्षी ६ हजार प्रतिनिधी इफ्फीसाठी नोंद झाले होते असे तालक यांनी सांगितले. प्रसार माध्यमांचे ५५५ पत्रकारांनी नोंदमी केली असून ३०० जणांना मंजुरी मिळाली आहे असे तालक यांनी सांगितले.

टॅग्स :Shahid Kapoorशाहिद कपूर