शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फीचे उद्घाटन शाहरूख खानच्या हस्ते, आयोजकांकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 20:57 IST

पणजी: येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन येत्या 20 रोजी बांबोळी येथील शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमात सायंकाळी बॉलिवूडचे बादशाह शाहरूख खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पणजी: येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन येत्या 20 रोजी बांबोळी येथील शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमात सायंकाळी बॉलिवूडचे बादशाह शाहरूख खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. इफ्फीच्या आयोजकांनी तसे जाहीर केले आहे.उद्घाटन सोहळ्यावेळीच भारतीय चित्रपट उद्योग संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल. तसेच उद्घाटनानंतर कला अकादमीत इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांच्या बियोंड द क्वाऊड्स चित्रपटाने इफ्फीची सुरुवात होईल. तर इंडो-अजर्टाईन चित्रपट निर्माता पाबलो सेजार यांच्या रवींद्रनाथ टागोर यांच्यावर आधारित थिंकिंग ऑफ हीम चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल.जागतिक चित्रपट व खास करून भारतीय चित्रपट क्षेत्रात इफ्फी म्हणजे वेगळाच उत्साह दिसून येतो. जगभरातील उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी इफ्फी निमित्त व्यासपीठ दिले जात असून ही मोठी गोष्ट असल्याचे शाहरूख खान यांनी इफ्फी विषयी बोलताना सांगितले आहे. इफ्फी यंदा 48व्या वर्षात पदार्पण करत असून आम्ही चित्रपटाचे भवितव्य साजरे करू, या व मोठ्या मानाने आपण इफ्फी प्रतिनिधींचे स्वागत करत असल्याचे खान यांनी सांगितले आहे.इफ्फीचे उद्घाटन करण्याची शाहरूख खान यांची ही प्रथम वेळ नसून त्यांनी 2007 मध्ये पणजीत 38व्या इफ्फीचे उद्घाटन केले होते. तसेच 2011 मध्ये मडगाव येथे 41व्या इफ्फीत देखील सहभागी होऊन त्यांनी उद्घाटन केले होते. शाहरूख खान बरोबरच अनेक दिग्गज कलाकार व बॉलिवूड सितारे यंदा इफ्फीत सहभागी होणार आहेत. इफ्फीच्या समारोप सोहळ्यात यंदा बीग बी अमिताभ बच्चन यांचा देखील गौरव होणार आहे. बच्चन यांनी भारतीय सिनेसृष्टीत दिलेल्या एकूण योगदानाचा गौरव समारोप सोहळ्यावेळी केला जाणार आहे.

टॅग्स :goaगोवा