शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

यंदा इफ्फी 8 दिवसांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 18:54 IST

राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान होणा:या 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यंदा हा महोत्सव आठ दिवसच असेल

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २५  : राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान होणा:या 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यंदा हा महोत्सव आठ दिवसच असेल. दरवर्षी 20 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असे, यंदापासून यातील दोन दिवस कमी केलेत. महोत्सवात 1 सप्टेंबर 2015 ते 31 ऑगस्ट 2016 या कालावधीतील तयार झालेले चित्रपट इंडियन पॅनोरमा विभागात पाठविण्यात येतील.

त्यासाठी चित्रपटांच्या प्रवेशिका मागविल्या आहेत. सेन्सॉर न झालेले चित्रपटही या विभागासाठी पाठविले जाऊ शकतात. इंडियन पॅनोरमासाठी पाठविण्यात येणा:या चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स असणो अत्यंत आवश्यक आहे. या प्रवेशिका केवळ ऑनलाईन सादर करण्याचा पर्याय आहे. ऑनलाईन अर्जाची सही व शिक्क्यासह छापील प्रत चित्रपट महोत्सव संचालनालयाकडे पाठवावी.

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2016 आहे. ऑनलाईन अर्जाची छापील प्रत स्वीकारण्याची अंतिम मुदत 13 सप्टेंबर अशी आहे. प्रवेशिका पाठविण्यास इच्छुक असलेल्यांसाठी खास सूचना ऑनलाईन वाचता येतील, असे चित्रपट संचालनालयाने वेबसाईटद्वारे सुचविले आहे. गोवा मनोरंजन संस्थेने इफ्फीसाठीची पूर्वतयारी सुरू केली आहे. यासाठी कार्यक्रम व्यवस्थापन एजन्सी मंडळासाठी निविदा जाहीर केल्या आहेत.