शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

देशाला अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर, अधिक बचत करणे आवश्यक - निखिल गुप्ता

By समीर नाईक | Updated: February 23, 2024 14:25 IST

सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

पणजी : भारताला आपली अर्थव्यवस्था ८ टक्के दराने वाढवायची असेल तर पुढील दोन दशकांमध्ये अधिक बचत करणे आवश्यक आहे.अर्थव्यवस्थेत घरगुती (घरे आणि छोटे व्यवसाय), कॉर्पोरेट क्षेत्र, सरकार आणि विदेशी व्यापार हे चार प्रमुख घटक असल्याचे सांगितले. हे घटक कोणतीही अर्थव्यवस्था बनवतात किंवा बिघडतात, असे मत अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता यांनी व्यक्त केले.

पणजीत शुक्रवारी सकाळी इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे त्यांच्या “द एट पर्सेंट सोल्युशन” या पुस्तकावर आयोजित व्याख्यानात गुप्ता बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण देशाला बचत करायची असेल आणि वाढीचा दर स्थिर ठेवायचा असेल तर राज्य आणि केंद्र सरकारांनी त्यांचे कर्ज कमी करणे आवश्यक आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने घरगुती क्षेत्रात बचतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. खाजगी क्षेत्राला पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करून सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.

सरकारने स्वतःचे कर्ज कमी करण्यासाठी संरक्षण, रेल्वे आणि रस्ते बांधणी यासारख्या क्षेत्रांचे खाजगीकरण केले पाहिजे. बचत हा गुंतवणुकीसाठी प्राथमिक स्त्रोत आहे. गुंतवणूक कोणत्याही देशात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीस मदत करते. केवळ साधा उपभोग अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत करू शकत नाही, असे गुप्ता यांनी अधिक माहिती देताना सांगितले. 

अमेरिकेत आर्थिक संकट येण्याची शक्यता 

कोणत्याही उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी अमेरिका हा चांगला आदर्श नाही. आज ते मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कर्ज माफ करत आहेत. याचे परीणाम लवकरच दिसू लागतील आणि ४ ते ५ वर्षांत यूएसएला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, असे अमेरिकेच्या कर्जाभिमुख अर्थव्यवस्थेवर बोलताना गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाEconomyअर्थव्यवस्था