शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

गोव्यात मुख्यमंत्री बदलला तर सरकार पडणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 18:58 IST

गोव्यात भाजपाकडे स्वत:चे फक्त चौदा आमदार असून त्यापैकी तीन आजारी आहेत. अशास्थितीत मुख्यमंत्रीपदावरील नेता बदलला तर सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष नाराज होतील व सरकार कोसळेल याची कल्पना गेल्या चोवीस तासांत भाजपामधील अनेक जाणकारांना आली आहे.

पणजी : गोव्यात भाजपाकडे स्वत:चे फक्त चौदा आमदार असून त्यापैकी तीन आजारी आहेत. अशास्थितीत मुख्यमंत्रीपदावरील नेता बदलला तर सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष नाराज होतील व सरकार कोसळेल याची कल्पना गेल्या चोवीस तासांत भाजपामधील अनेक जाणकारांना आली आहे. दुस-याबाजूने विरोधी काँग्रेस पक्षाने सरकारवरील दबाव वाढवला आहे. चोवीस तासांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराविषयीची सगळी कागदपत्रे व त्यांचा आजार तपशीलासह जाहीर करा अशी मागणी गुरुवारी काँग्रेसने केली आहे.

चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत सरकारचा सगळा डोलारा हा म.गो. पक्ष आणि गोवा फॉरवर्ड व तिघा अपक्ष आमदारांवर अवलंबून आहे. विरोधी काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे. भाजपाचे चौदापैकी दोन आमदार इस्पितळात आहेत. ते गंभीर आजारी आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोहर पर्रीकर यांना संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात मुख्यमंत्री म्हणून यावे लागले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आता वारंवार आजारी होऊ लागल्याने व त्यांचा बहुतांशवेळ उपचारांसाठी जात असल्याने गोवा सरकारला कुणी वालीच राहिला नाही अशी स्थिती झाली आहे. नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा व ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर हे इस्पितळात असल्याने त्यांच्याकडील खातीही मुख्यमंत्र्यांकडेच आहे. सुमारे 26 खाती मनोहर पर्रीकर यांच्या ताब्यात आहे. प्रशासन ठप्प झाल्यासारखी स्थिती असल्याने लोकांमधून तिखट प्रतिक्रिया येत आहेत.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारांसाठी तिस-यांदा अमेरिकेला रवाना झाले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता ते मुंबईहून अमेरिकेला गेले. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला लोकांचा रोष स्वीकारावा लागेल अशी कल्पना आल्याने व लोकभावना संतप्त असल्याची जाणीव झाल्याने भाजपाने तूर्त काही महिन्यांसाठी पर्यायी मुख्यमंत्री म्हणून दुस:या एखाद्या नेत्याची नियुक्ती करता येईल काय याची चाचपणी मंगळवार व बुधवारी करून पाहिली. तथापि, भाजपाचे आमदार डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री म्हणून घटक पक्षांना मान्य नाही. तसेच स्वत: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपण आठ दिवसांतच अमेरिकेहून उपचार घेऊन येईन असे भाजपाच्या कोअर टीमला सांगून नव्या हालचालींविषयी आपली अस्वस्थताही बुधवारी दाखवून दिल्याने भाजपाने आपला विचार बदलला.

-  मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी लोकमतला सांगितले, की आमच्या पक्षाचा पाठिंबा हा फक्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाला आहे. आम्ही मनोहर पर्रीकर यांनाच पाठिंबा दिलेला असल्याने आम्ही वेगळा विचार करू शकत नाही.

- गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनीही लोकमतशी बोलताना अशीच भावना व्यक्त केली. सध्या मुख्यमंत्रीपदासाठी जागा रिकामीच नाही असे डिमेलो म्हणाले. 

- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न नाही. मनोहर पर्रीकर हेच आमचे नेते, असे तेंडुलकर यांनी दिल्लीहून लोकमतला सांगितले. 

- आपण स्वत: गुरुवारी रात्रीच विदेशात एका परिषदेसाठी जात आहे. आपण अमित शहा किंवा अन्य कुणा नेत्याला राजकीय चर्चेसाठी भेटण्याचा आता प्रश्न येत नाही, असे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर