शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहीन: आमदार गोविंद गावडे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 12:38 IST

कोडार-बेतोडा येथील प्रस्तावित आयआयटी क्षेत्रातील कष्टकऱ्यांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : कोडार व बेतोडा येथे जो आयआयटी प्रकल्प प्रस्तावित आहे किंवा त्यासंबंधी हालचाली चालू आहेत त्यावर माझे लक्ष राहील. प्रत्यक्षात खरेच जर तो प्रकल्प साकार झाला आणि कष्टकरी आदिवासी लोकांच्या जमिनी प्रकल्पाच्या घशात जात असतील तर संपूर्ण 'उटा' संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन आमदार गोविंद गावडे यांनी दिले. मंगळवारी त्यांनी कसमशेळ-बेतोडा येथे ग्रामस्थांची भेट घेत भावना समजून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार गावडे म्हणाले की, जिथे अन्याय तिथे 'उटा' संस्था आहे. कुणाला कधी पाठिंबा द्यायचा याचे ज्ञान उटा संघटनेला आहे. कुणाच्या दावणीला बांधलेली ही संघटना नाही. स्थानिक ग्रामस्थांनी मला लेखी निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनाच्या आधारे संपूर्ण परिसर मी त्यांच्याबरोबर फिरून पाहीन. नेमके काय आहे व नेमके किती नुकसान होणार आहे याचा सखोल अभ्यास केल्यानंतरच मुख्यमंत्र्यांसमोर हा अभ्यास ठेवणार आहे.

येथे जिथे सरकार आयआयटी प्रकल्प आणू पहात आहे ती संपूर्ण जागा हे शेतकऱ्यांची आहे. मुख्य म्हणजे या शेती बागायती आदिवासी समाजाने आपले रक्त आटवून उभ्या केल्या आहेत. परंतु बहुतांश जागेत रानटी जनावरांसाठी व पाळीव पशुपक्षांसाठी चारा व इतर पालापाचोळा या डोंगरमाथ्यावर तयार होतो. साहजिकच ज्यावेळी आयआयटी सारख्या प्रकल्पामुळे त्यांच्या शेतावर नांगर फिरणार असेल तर ते आवाज काढणारच. वेळ आल्यावर त्या लोकांचा आवाज नक्कीच बनेन. आणि तेच सागण्यासाठी मी येथे आलो आहे, असेही आमदार गावडे म्हणाले.

सलग जमीन मिळणे कठीण

आमदार गावडे म्हणाले, खरे तर ज्यावेळी मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयआयटीचा प्रस्ताव माझ्‌यासमोर ठेवला होता. त्यावेळेसच मी त्यांना बारा लाख चौरस मीटर जमीन ऐवजी सात लाख चौरस मीटर जमीन संपादन करण्याचा पर्याय दिला होता. कारण बारा लाख चौरस मीटर जमीन सलगपणे गोव्यात मिळणे कशी अवघड आहे त्यांना समजावून सांगितले होते.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण