शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती हिंसेला कंटाळून पत्नीने केला पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 18:45 IST

वास्को येथे राहणा-या संध्या चौहान ह्या महिलेने तिचा पती कौशेलेंद्र प्रतापसिंग चौहान याच्या डोक्यावर लाडकी काठी (रिप) भरपूर वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार रविवारी (दि.२) सकाळी उघडकीस आला.

वास्को: दारूच्या नशेत सतत होणाऱ्या सतवणूकीला कंटाळून वरुणापूरी, वास्को येथे राहणा-या संध्या चौहान ह्या महिलेने तिचा पती कौशेलेंद्र प्रतापसिंग चौहान याच्या डोक्यावर लाडकी काठी (रिप) भरपूर वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार रविवारी (दि.२) सकाळी उघडकीस आला. खून झालेला कौशेलेंद्र चौहाण मागच्या दोन वर्षांपासून भारतीय नौदलाच्या गोवा विभागात ‘एअरक्राफ्ट हँन्डलर सेलर’ म्हणून काम करत असून शनिवारी रात्री दारू पिऊन घरी गेल्यानंतर पत्नीची मारहाण करण्याबरोबरच सात वर्षीय मुलीला भांडणावेळी धक्का दिल्याचे संध्याच्या नजरेस येताच याच रागाच्या भरात तिने त्याच्यावर हल्ला केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.रविवारी सकाळी ७.४० च्या सुमारास सदर खून प्रकरणाची माहिती वास्को पोलिसांना मिळाली. वास्कोतील नौदलाच्या ‘आयएनएस गोमंन्तक’ मधील जिवंती इस्पितळातून पोलिसांना येथे उपचारासाठी आणलेल्या कौशेलेंद्र चौहाण याचा मृत्यू झाल्याची माहीती मिळाली. ह्या खून प्रकरणाबाबत अधिक माहीती घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांना संपर्क केला असता कौशेलेंद्र मागच्या दोन वर्षांपासून नौदलाच्या गोवा विभागात कामाला असल्याचे सांगून तो वरुणापुरी, वास्को येथील नौदल वसाहतीत आपल्या पत्नी तसेच मुलीसहीत राहत असल्याची माहिती त्यांनी दिली. ह्या खून प्रकरणाची प्राथमिक चौकशीच्या वेळी कौशेलेंद्र वेळोवेळी तिच्या पत्नीला दारूच्या नशेत मारहाण तसेच सतवणूक करत असल्याचे आढळून आलेले असल्याचे सावंत यांनी माहितीत पुढे सांगितले.शनिवारी उशिरा रात्री तो पुन्हा दारूच्या नशेत घरी परतल्यानंतर त्यांने त्याची पत्नी संध्याशी किरकोळ विषयावरून वाद सुरू केल्यानंतर तिची जबर मारहाण केली. तसेच त्याने घरात असलेला ‘एअर कूलर’, देवारा व इतर वस्तूंची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात घरात हिंसा करण्यास सुरुवात केल्याचे प्राथमिक चौकशीत सामोरे आले असल्याचे पोलीस उपअधीक्षक सावंत यांनी सांगितले. संध्याची मारहाण करत असताना त्यांची सात वर्षाची मुलगी तेथे आली असता त्यांने तिला धक्का दिला असून पतीकडून करण्यात येत असलेल्या सतावणुकीला कंटाळून संध्याने नंतर येथे असलेल्या लाकडी काठीने त्याच्या डोक्यावर हल्ला केला.कौशेलेंद्र दारूच्या नशेत असल्याने ह्या हल्यात तो खाली पडल्यानंतर रागाच्या भरात असलेल्या संध्याने त्याच्या डोक्यावर आणखीन वार केल्याचे पोलिसांना तपासणीच्या वेळी उघड झाले आहे. पोलीस सूत्रांच्या माहीतीनुसार संध्याने कौशेलेंद्र वर पहिला वार केला असता काठी तुटली असून नंतर तिने त्या तुटलेल्या काठीच्या धार - धार बाजूने त्याच्या डोक्यावर आणखीन जबर हल्ले केले. ह्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कौशेलेंद्र याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याचे संध्याला दिसून येताच तिने नंतर त्वरित शेजाऱ्यांना संपर्क करून त्यांच्या मदतीने त्याला उपचारासाठी नौदलाच्या जिवंती इस्पितळात नेले. येथे आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करून नंतर याबाबत वास्को पोलिसांना माहिती दिल्याचे सावंत यांनी माहितीत सांगितले.आपल्या पतीचा खून केलेल्या संध्या हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्या विरुद्ध भादंसं ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौशेलेंद्र व त्याची पत्नी मूळ फिरोजाबाद, उत्तरप्रदेश येथील असून सदर प्रकरणाबाबत त्यांच्या गावी कुटूंबियांना माहीती देण्यात आली आहे. मृत कौशेलेंद्र याचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आलेला असून उद्या त्याच्यावर शवचिकित्सा करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीत सदर खून घरगुती हिंसामुळे झालेला असल्याचे दिसून येत असून ह्या प्रकरणाची तपशील रित्या चौकशी करून यात अन्य काही कारणे आहेत का याबाबतही चौकशी चालू असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी शेवटी माहीतीत सांगितले. वास्को पोलीस ह्या खून प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.