शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आणि गोव्यातील दोन मंत्र्यांमध्ये झाली दिलजमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 13:10 IST

वीज दरवाढीच्या विषयावरून वीज मंत्री पांडुरंग मडकईकर व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यात काही दिवसांपूर्वी शीतयुद्ध रंगले व दोन्ही भाजप नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली.

पणजी : वीज दरवाढीच्या विषयावरून वीज मंत्री पांडुरंग मडकईकर व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यात काही दिवसांपूर्वी शीतयुद्ध रंगले व दोन्ही भाजप नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली. मात्र गुरुवारी रात्री बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या एका कौटुंबिक सोहळ्यावेळी मडकईकर व विश्वजित यांच्यात दिलजमाई घडून आली. अनेक मंत्री व आमदारांच्या साक्षीने या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अलिंगनही दिले.राजकारणात अनेकदा चित्र जे लोकांना दिसत असते, तसे ते असत नाही. दोन नेते एकमेकांचे कट्टर शत्रू बनल्याचे चित्र बाहेर दिसत असले तरी, प्रत्यक्षात स्थिती तशी असतेच असे नाही. राज्यातील वीजेच्या दरात गेल्या आठवड्यात मोठी वाढ झाली. त्यामुळे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेतली व वीज दरवाढीच्या विषयावरून टीका केली. जर दरवाढ मागे घेतली नाही तर आपण पणजीत दहा हजार लोकांना घेऊन मेणबत्ती मोर्चा काढू,असा इशाराही मंत्री राणो यांनी  दिला. त्यानंतर लगेच मंत्री मडकईकर यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले. वीज दरवाढीच्या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीतच चर्चा झाली होती व त्या बैठकीला विश्वजित हे अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांना विषयाचा अभ्यासच नाही, असे मडकईकर म्हणाले होते. या दोन्ही नेत्यांमधील या शीतयुद्धाची दखल भाजपच्या कोअर टीमनेही घेतली होती. मडकईकर यांनी नंतर घरगुती वापरासाठीच्या वीजेच्या दरातील वाढ घेण्याचीही घोषणा केली.

मंत्री मडकईकर व राणे हे एकमेकांशी बोलत नव्हते. मडकईकर यांच्या घर प्रवेश सोहळ्य़ालाही विश्वजित राणे उपस्थित राहिले नव्हते. पण प्रथमच त्यांची मंत्री ढवळीकर यांच्या कौटुंबिक सोहळ्य़ावेळी एकमेकांशी भेट झाली. त्या सोहळ्य़ावेळी अनेक मंत्री, आमदार, माजी आमदार उपस्थित होते. मंत्री विश्वजित यांनी या सोहळ्य़ावेळी प्रथम मडकईकर याना मिठी मारली. वीज दरवाढ मागे घेण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो असे मंत्री राणो म्हणाले. मडकईकर व राण यांच्या नंतर बराचवेळ गप्पा झाल्या. ही भेट फोटोमध्ये बंदिस्त करून ठेवूया असेही काही मंत्री यावेळी विनोदाने म्हणाले.