शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायली अटालाकडे आधार कार्ड कसे? कागदपत्रे सादर करा; हायकोर्टाचे यूआयडीएआयला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:40 IST

अटालाला आधार कार्ड मंजूर केल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने यूआयडीएआयवर कायद्याचा बडगा उगारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : इस्रायली ड्रग्स डीलर अटाला ऊर्फ यानीव बेनाईम याला आधार कार्ड कोणत्या आधारावर मंजूर केले. त्याची कागदपत्रांसह सविस्तर माहिती न्यायालयात सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाला (यूआयडीएआय) दिला आहे. 

अटालाला आधार कार्ड मंजूर केल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने यूआयडीएआयवर कायद्याचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात न्यायालयात सविस्तर कागदपत्रे सादर करण्यात यावीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. आधार कार्डसाठी अर्ज करताना अटालाने कोणती माहिती व कागदपत्रे सादर केली होती, तसेच कोणत्या निकषांवर आधार कार्ड मंजूर केले आणि त्याने कागदपत्रे कोणती सादर केली होती याची माहिती यूआयडीएआयला सादर करावी लागेल. १७ जूनपूर्वी ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

'त्या' संस्थेचीही माहिती द्या

ज्या अधिकृत नोंदणी संस्थेद्वारे त्याचा अर्ज प्राप्त झाला होता त्या संस्थेची माहितीही न्यायालयाने मागितली आहे. ती माहितीही या प्रकरणातील फाइलमध्ये असावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण...

ड्रग्स प्रकरणात खटला सुरू असतानाही पुन्हा ड्रग्स व्यवहार करीत असल्याचे आढळून आल्यानंतर अटाला याला अमली पदार्थ विरोधी विभागाडून शिवोली येथून अटक केली होती. त्याच्याकडे अमली पदार्थाबरोबर आधार कार्डही सापडले होते. ड्रग्स प्रकरणाचा अमली पदार्थ विरोधी विभाग तपास करत आहे, तर आधार कार्ड प्रकरणात हणजूण पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपासावेळी हे आधार कार्ड छाननीसाठी यूआयडीएआयकडे पाठविण्यात आले होते. यूआयडीआयकडून हे आधार कार्ड वैध असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे आधार कार्डसाठी अटालाने सादर केलेली कागदत्रांची मागणी पोलिसांनी केली होती; परंतु या प्रकरणात यूआयडीएआयकडून सहकार्य होत नसल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात नेले होते.

 

टॅग्स :goaगोवाAdhar Cardआधार कार्डHigh Courtउच्च न्यायालय