शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिसियोच्या छपराचा पंखा तुटून महिला जखमी; सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवूनही खाते सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 18:44 IST

मोडकळीस आलेल्या हॉस्पिसियोच्या महिला वॉर्डातील छपराचा पंखा तुटून खाली पडल्याने एक रुग्ण महिला जखमी झाली.

 

मडगाव: मोडकळीस आलेल्या हॉस्पिसियोच्या महिला वॉर्डातील छपराचा पंखा तुटून खाली पडल्याने एक रुग्ण महिला जखमी झाली. यानंतर युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आयरा आल्मेदा यांना घेराव घातला असता या वॉर्डाच्या दुरुस्तीबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याला मागच्या ऑक्टोबर महिन्यातच कळविले होते. मात्र त्या खात्याच्या अभियंत्यांनी पुढे काहीच केले नसल्याचे उघड झाले.गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. तीव्र मधुमेहाच्या रुग्ण असलेल्या बोर्डा मडगाव येथील रामरती नास्नोडकर या महिलेला हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले होते. ती खाटीवर झोपली असताना वरचा पंखा तुटून तिच्या पायावर पडला. या रुग्ण महिलेच्या खाटेखाली जमिनीवर आणखी एका वृद्ध रुग्ण महिलेला झोपवले होते. हा पंखा तिच्या बाजूला पडला त्यामुळे ती बचावली. या वॉर्डातील छप्पराचा पंखा तुटून पडण्याची ही दुसरी घटना असून या वॉर्डची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.हॉस्पिसियोची ही इमारत दीडशे वर्षापेक्षा जुनी असून ती पूर्णत: मोडकळीस आली आहे. यापूर्वी एका वॉर्डचा सज्जा तुटूनही एक रुग्ण जखमी झाला होता. अशातच या इस्पितळात रुग्णांना झोपण्यासाठी खाटांची कमतरता असल्याने रुग्णांना जमिनीवरच झोपविले जाते. मडगावात नवीन इस्पितळ बांधून तयार झाले असले तरी काही किरकोळ दुरुस्त्या करण्याचे काम बाकी असल्याने ही इमारत अजून चालू झालेली नाही. दरम्यान बोर्डातील सामाजिक कार्यकर्ते कामिल बर्ाेटो यांनी या घटनेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना 15 जानेवारीपर्यंत जर नवीन इस्पितळ सुरू झाले नाही किंवा त्याबद्दल आम्हाला ठाम आश्वासन मिळाले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. यासंदर्भात बर्ाेटो यांनी नंतर फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली असून हॉस्पिसियोच्या अधिका-यांवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.सायंकाळी युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हादरेळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घातला. या इस्पितळात असलेल्या कर्मचा-यांकडून रुग्णांना अगदी हीन वागणूक दिली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जर अशा तक्रारी असल्यास त्या आपल्याला सांगा त्या कर्मचा-यांवर कारवाई करू, असे यावेळी डॉ. आल्मेदा यांनी सांगितले.