शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

हाय प्रोफाईल सेक्स प्रकरणे का दडपता? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत  प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 20:43 IST

हाय प्रोफाईल सेक्स रेकेट प्रकरणात आरोपपत्र दाखल न करता दडपून टाकत असल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी विधानसभेत केला. पणजीतील ताज विवांता या पंचतारांकीत हॉटेलमध्ये उघडकीस आणलेल्या एका हाय प्रोफाईल प्रकरणाचा पुराव्यासह उल्लेख करून त्यांनी स्पष्टीकरण मागितले. 

पणजी: हाय प्रोफाईल सेक्स रेकेट प्रकरणात आरोपपत्र दाखल न करता दडपून टाकत असल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी विधानसभेत केला. पणजीतील ताज विवांता या पंचतारांकीत हॉटेलमध्ये उघडकीस आणलेल्या एका हाय प्रोफाईल प्रकरणाचा पुराव्यासह उल्लेख करून त्यांनी स्पष्टीकरण मागितले. गोव्यात विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून उघडकीस आणलेली वेश्याव्यवसाय प्रकरणांची माहिती हळर्णकर यांनी विचारली होती. २०१७ मध्ये एकूण २९ प्रकरणे असल्याचे उत्तर देण्यात आले. या २९ प्रकरणा पैकी  एकाही प्रकरणात आरोपीला दोषी घोषीत करण्यात आलेले नाही तर पैकी ४ प्रकरणात आरोपपत्रही दाखल न करता गुन्हा मागे घेण्यात आलयाची माहिती देण्यात आली. त्यापैकी एक प्रकरण जे हाय प्रोफाईल म्हणून आमदाराने उल्लेख करण्यात आले होते ते हॉटेल विवांतातील प्रकरणात का आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे अशी मागणी त्यांनी केली. गृहखाते सांबाळणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सरकारचे नेतृत्व करणारे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी साक्षिदार साक्षी देण्यासाठी न्यायालयात येत नसल्यामुळे आरोपी सुटतात, तसेच काही प्रकरणात पुरावेच सापडत नाहीत आणि त्यामुळे संशयितांना फायदा मिळतो असे सांगितले. परंतु ज्या प्रकरणात स्वत: पोलीसच साक्षीदार होते तिथे साक्षिदार अनुपस्थित राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे हळर्णकर यांनी सांगितले. विवांता हॉटेलमधील प्रकरणात बोगस गिºहायिक बनून गेलेला माणूस हा पोलीसच होता आणि हा भक्कम पुरावा होता. या प्रकरणात आरोपपत्रच दाखल करण्यात आलेले नाही तर साक्षिदाराचा प्रश्न कुठे उद्भवतो असा प्रश्नही त्यांनी केला. तरूण तेजपाल सारख्या माणसांवर स्वेच्छा नोंद घेऊन दाखल घेऊन कारवाई केली जाते आणि पोलिसांनी पुराव्यांसह पकडलेले संशयित न्यायालयात सुटतात याचा अर्थ काय असा प्रश्न त्यांनी केला. आपल्याला या प्रकरणात तूर्त फारशी माहिती नाही, परंतु या प्रकरणात चौकशी करता येईल असे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :goaगोवा