शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीजमंत्र्यांविरुध्दच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लोकायुक्तांसमोर उद्या सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 20:38 IST

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याविरुध्दच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लोकायुक्तांसमोर उद्या सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.

पणजी  - वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याविरुध्दच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लोकायुक्तांसमोर उद्या सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी गेल्या महिन्यात मंत्री मडकईकर तसेच मुख्य सचिव व दक्षता खात्याच्या लांच लुचपतविरोधी विभागाच्या अधिक्षकांना नोटिसा बजावल्या होत्या. 

आयरिश रॉड्रिग्स यांनी सादर केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वरील तिघांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणात लांचलुचपतविरोधी विभागाला फाइल्स परत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आयरिश यांनी या प्रकरणात दक्षता खात्याच्या लांच लुचपतविरोधी विभागाकडे तक्रार केली होती. परंतु या विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर त्यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली. मडकईकर यांनी जुने गोवें येथे बॉ जिझस बासिलिका चर्चजवळ सुमारे २00 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या आलिशान बंगल्याचा हवाला देऊन आयरिश यांनी ही तक्रार केली होती. 

जेनिता या जुने गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. या उभयतांविरुध्द १९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (ड) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२0 (ब) खाली गुन्हे नोंद करून लाचलुचपत विभागाला या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी आयरिश यांची मागणी आहे. २0१५-१६ च्या आयकर विवरणपत्रात मंत्री मडकईकर यांनी  स्वत:चे वार्षिक उत्पन्न १,४४,३८९ रुपये एवढे अल्प उत्पन्न दाखवले आहे. असे  असताना २00 कोटींचा आलिशान बंगला बांधला कसा, असा प्रश्न आयरिश यांनी उपस्थित केला आहे. मडकईकर हे सध्या आजारी असून मुंबईतील खाजगी इस्पितळात वैद्यकीय उपचार घेत आहेत. 

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या