शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

"आरोग्यमंत्र्यांनी आधी मुख्यमंत्र्यांना कोविड रुग्णालयाचे दर्शन घडवावे"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 21:02 IST

काँग्रेसची मागणी; मुख्यमंत्र्यांना पदावरून क्वारंटायन करण्याचा प्रयत्न

मडगाव - कोविड हाताळणीत सपशेल अपयशी ठरलेल्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यानी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना सोबत घेऊन मडगावच्या कोविड इस्पितळाला भेट देण्याची  धाडस दाखवावे असे आव्हान गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी दिले आहे. 

विरोधकाना आपल्यासोबत कोविड इस्पितळात या असे सांगणाऱ्या आरोग्यमंत्र्यानी एकदाही कोविड रुग्णाना दाखल केलेल्या मडगावच्या इएसआय इस्पितळाला आजपर्यंत भेट दिलेली नाही. आपण कोविड इस्पितळात नियमीत जातो म्हणणारे विश्वजीत राणे आपले राजकीय इस्पित साध्य करण्यासाठी कोविड देखरेख केंद्रात भेटीसाठी जातात म्हणुन सांगुन प्रत्यक्षात माजी मंत्री तथा विद्यमान आमदारांच्या घरी भेट देतात व मुख्यमंत्र्याना त्यांच्या पदावरुन काॅरंटायन करण्याचा प्रयत्न करतात हे जनतेसमोर उघड झाले आहे.  

भाजपचे आमदार क्लाफासियो डायस यानी कोविड इस्पितळाऐवजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार घेण्याचे पसंत केल्याने मडगावच्या कोविड इस्पितळाचा बोजवारा उडाल्याचे सिद्ध झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.

गोवा सरकार कोविड हाताळणीत पुर्णपणे अपयशी ठरले असुन, अव्यवस्था व अनास्थेमुळे मडगावच्या इएसआय इस्पितळात डाॅक्टर, कर्मचारी व रुग्ण यांच्या मनात असंतोष खदखदत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यानी चार दिवसांमागे  मडगावात येऊन कोविड इस्पितळाला भेट न देताच पळ काढला असा दावा गिरीश चोडणकर यानी केला आहे.

कोविड रुग्णांना पंचतारांकीत सेवा व सुविधा  सरकार देऊ शकत नाही असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यानी त्यांच्या डिफेक्टीव्ह कारभारामुळे रुग्ण, वैद्यकिय पथक व इतर कर्मचारी याना मुलभूत सुविधाच उपलब्ध होत नसल्याचे ध्यानात ठेवावे. सरकार निर्मीत गंभीर परिस्थीतीमुळेच डाॅ. एडविन गोम्स यांच्या पत्नीला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले हे डाॅ. प्रमोद सावंतानी लक्षात घ्यावे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यानी कोविड संकटकाळात लुटमार चालवली असुन, कमिशन ते एकटेच खात असल्याने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे पटत नाही असा दावा गिरीश चोडणकर यानी केला आहे.  दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यानी सदर इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करणे तसेच वरचे दोन मजले का रिकामे ठेवले आहेत यावर भाष्य केले नाही यावरुन सरकारचा छूपा अजेंडा असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजप सरकारने गोव्याला आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर केले असुन, आता जनतेच्या आरोग्याशी खेळ करुन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री राज्याला "कोविड डेस्टीनेशन"चा दर्जा देतील असा दावा गिरीश चोडणकर यानी केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPramod Sawantप्रमोद सावंत