शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे इंजिनाच्या टपावर बसला अन जीव गमावून बसला; मडगावातील घटना

By सूरज.नाईकपवार | Updated: November 30, 2023 20:28 IST

रेल्वे इंजिनाच्या टपावर बसला अन जीव गमावून बसण्याची एक दुदैवी घटना गोव्याच्या मडगाव येथील  कोकण रेल्वे स्थानकावर घडली.

सूरज नाईकपवार मडगाव: रेल्वे इंजिनाच्या टपावर बसला अन जीव गमावून बसण्याची एक दुदैवी घटना गोव्याच्या मडगाव येथील  कोकण रेल्वे स्थानकावर घडली. १६ नोव्हेंबरला मयताने वरील धाडस केले होते. निर्मोद लगून (२९) असे मयताचे नाव असून , तो मूळ झारखंड राज्यातील आहे. विद्युत वाहिनांचा स्पर्श झाल्याने तो होरपळला होता. नंतर त्याला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले होते. गेले पंधरा दिवस तो मृत्युझी झुंजत होता शेवटी त्याची प्राणज्योत मालवली.

निर्मोद हा झारखंडहून १६ नोव्हेंबरला गोव्यात कामासाठी आला होता. तो येथील गांधी मार्केट येथे रहात होता अशी माहिती कोकण रेल्वे पोलिसांनी दिली. तो वैफल्यग्रस्तही होता. त्याने दारुही प्याली होती असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

१६ नोव्हेंबर रोजी वालंकिणी ते वास्को रेल्वेने मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर थांबा घेतला असता, निर्मोद त्या रेल्वेच्या इंजिन डब्याच्या टपावर चढला. त्याला विद्युत वाहिन्याचा स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला. नंतर त्याला तातडीने उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले.संबधित घटनेची माहिती पोलिसांनी नंतर त्याच्या कुटुंबियालाही कळविली होती. मृतदेह संबधितांच्या स्वाधीन केला आहे.

अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. गोम्स पुढील तपास करीत आहेत.