शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे हाहाकार; जनजीवन विस्कळीत, केरी-सत्तरी, वाळपईसह केपे परिसराला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:20 IST

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः बंगालच्या महासागरात डिप्रेशन तयार झाल्यामुळे सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. काल पावसाने राज्याला पुन्हा झोडपले. सकाळपासूनच मुसळधार सुरू होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका केरी- सत्तरी, वाळपई, केपेसह डिचोली परिसराला बसला असून राज्यात ९३ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. भुईपाल परिसरातील १२ हून अधिक घरांत पाणी शिरले असून तेथील लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. झाडांच्या पडझडीमुळे वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला.

सत्तरीत नद्या, नाले तुडुंब भरले असून पूरस्थिती आहे. होडा वडदेव देवस्थानाजवळ वाळवंटी नदीला पूर आल्याने १२ घरांत पाणी शिरले. सत्तरीला पुराचा धोका कायम आहे. रात्रभर पावसाचा जोर राहिला तर मात्र दोन वर्षांची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे सरकारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. म्हादईच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अंजुणेतून विसर्ग, ९० मीटरवर पाणी पातळी

संततधार पाऊस सुरु असल्याने राज्यातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. साळावली तिळारीसह आमठाणे, गवाणे, पंचवाडी धरणे भरली होती. आता अजुणे धरणाची पाणी पातळी ९० मीटरवर पोहोचली आहे. धरणाचे चारही दरवाजे खुले झाले असून विसर्ग सुरू झाला.

डोंगराचा भाग कोसळला

पावसामुळे कुडचडे केपे येथील टाळी-शेल्डे परिसरात भूस्खलन झाले. यात विठ्ठल हुलगेकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस सुरू असतानाच मोठा आवाज आल्याने घरातील सर्वजण बाहेर धावले असता डोंगराचा एक भाग कोसळून हलगेकर यांच्या घराच्या दिशेने आला व क्षणार्धात हा प्रवाह घरात शिरून मोठे नुकसान झाले.

भुईपाल भागात १२ घरांत शिरले पाणी

पावसामुळे होंडा पंचायत क्षेत्रातील काही भागात संरक्षक भिंत नसल्याने ओहळातील पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. भुपाल -भेडशेवाडा २ येथील साया फूल पाण्याखाली गेला. तर वहदेवनगर येथे प्रमुख ओहळाच्या बाजूला असलेल्या १२ घरांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले आहे. ओहळाच्या बाजूला असलेल्या काही घरातील नागरिकांना होडा- वाळपई रस्ता गाठण्यासाठी गळाभर पाण्यातून वाट काढत जावे लागले.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊस