शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स फॅक्ट्रीमुळे हणजूण पोलिसांची नाचक्की

By वासुदेव.पागी | Updated: May 3, 2023 19:35 IST

पर्यटकांनी गजबजलेल्या हणजूण किनारी भागात ड्रग्सची फॅक्ट्री चालविली जाते आणि स्थानिक पोलिसांना याचा थांग पत्ताही लागत नाही.

पणजी (गोवा) : पर्यटकांनी गजबजलेल्या हणजूण किनारी भागात ड्रग्सची फॅक्ट्री चालविली जाते आणि स्थानिक पोलिसांना याचा थांग पत्ताही लागत नाही. नार्कोटीक कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) कारवाई करून ती उद्धवस्त करावी लागते, यावरून हणजूण पोलीसांची पूर्ण नाचक्की झाली आहे. 

एखाद्या ठिकाणी गांजा उत्पादन करण्याचे कारनामे झाले तर त्या गोष्टी  समजण्या सारख्या आहेत. कारण काहीही पेरले तर ते उगवतेच आणि गांजा  आणि इतर वनस्पती हे समजण्यासाठी वेळ जावा लागतो. त्यामुळे अशा गोष्टी अनेक ठिकाणी घडल्याही आहेत,  परंतु  कच्चा माल आणून एलएसडी सारख्या विदेशी आणि अत्यंत घातक अंमली पदार्थ बनविण्याची फॅक्ट्रीच सुखेनैव सुरू आहे आणि  स्थानिक हणजुणे पोलिसांना याचा पत्ताच नाही ही धक्कादायक गोष्ट आहे. यामुळे केवळ हणजुण पोलिसांची नव्हे तर गोवा पोलिसांची नाचक्की झाली आहे. 

एनसीबीकडून हणजुणे येथे कारवाई करून गुप्तपणे कार्यरत असलेल्या एलएसडी ड्रग्सच्या उत्पादन केंद्राचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत २५.१७ लाख रुपयांचा ड्रग्ससाठा जप्त केला आहे आणि ए कुंडु नामक बंगाली व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी हरमल येथे कारवाई करून ३० लाखांचा ड्रग्स जप्त केल्यानंतर एनसीबीची ही दुसरी मोठी कारवाई आहे. 

विस्तृत धागेदोरे  गोव्याबाहेरून कच्चा माल आणून या ठिकाणी एलएसडी हा घातक अंमली पदार्थ बनविला जात होता. या छाप्यात  कच्चा माल आणणे म्हणजे त्यासाठी नियमित पुरवठादार असणार, शिवाय कच्चा मालापासून एलएसडी बनविणारीही माणसे असणार. त्यामुळे ही फॅक्ट्री म्हणजे फारच मोठा उद्योग होता हे उघड होत आहे. इतकेच नव्हे तर पोलिसांना या छाप्याच्यावेळी कच्चामालासह अमेरिकन डॉलर्स आणि श्रीलंकन चलनी नोटाही जप्त केल्या आहेत. त्यामुळे या फॅट्र्रीचे धागेदोरे विदेशातही पोहोचल्याचा एनसीबीला संशय आहे.  साथिदार मोकाट या छाप्यात एकाला अटक करण्यात आली असली तरी एलएसडी निर्मिती हे एका माणसाचे काम असूच शकत नाही. कच्चा माल पुरविणारे आणि प्रत्यक्ष कच्चामालापासून एलएसडी बनविणारे आणि ते विकणारे कोण आहेत याची माहिती घेण्याचे एनसीबीडून प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ