शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुरू-शिष्य हे पवित्र नाते: मंत्री सुभाष शिरोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 12:45 IST

स्व. देवारी यांच्या स्मरणार्थ पहिला स्वर संवादिनी पुरस्कार डॉ. प्रदीप बोरकर यांना सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गुरू व शिष्य हे नाते पवित्र नाते आहे. माणूस आयुष्यात कितीही भरकटला किंवा उच्च पदावर पोचला तरी तो आपल्या आवडत्या गुरूला कधीच विसरत नाही. त्यांचे नाते व आठवण चिरंतर मनात राहते. स्व. शशिकांत देवारी यांनी अनेक कलाकार घडवले, त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवातून दिलेली श्रद्धांजली अप्रतिम आहे. गुरूमुळे शिष्य घडतो व मोठा होतो. गुरू-शिष्य नाते हे अंतिम सत्य आहे, असे उद्‌गार सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.

कला व सांस्कृतिक संचालनालयाच्या सहकार्याने श्री नवदुर्गा संस्थान व सम्राट क्लब बोरीतर्फे आयोजित पहिल्या स्व. शशिकांत ऊर्फ विनायक रामचंद्र देवारी स्मरणार्थ नाट्यमहोत्सवाचे उ‌द्घाटन मंत्री शिरोडकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित दीपक नार्वेकर, श्री नवदुर्गा संस्थान अध्यक्ष शाम प्रभुदेसाई, स्वागताध्यक्ष सुंदर प्रभुदेसाई, सम्राट क्लब बोरी अध्यक्ष संतोष नाईक, कार्यक्रम अधिकारी मिलिंद देवारी उपस्थित होते.

खास निमंत्रित दीपक नार्वेकर म्हणाले की, आयोजक व पुरस्कृत दात्यांच्या सहकार्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळते. सांस्कृतिक संवर्धन चळवळीत सम्राट क्लब बोरीच्या योगदानाबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

कलाकारांचा सन्मान

यावेळी स्व. देवारी यांच्या स्मरणार्थ पहिला स्वर संवादिनी पुरस्कार डॉ. प्रदीप बोरकर यांना सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला तर नाट्यकलाकार दिलीप च्यारी व गोपाळ ऊर्फ बाबल दुर्गाराम भट बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

महिलांनी सादर केला नाट्यप्रयोग

सत्काराला उत्तर देताना प्रदीप बोरकर यांनी स्व. देवारी यांच्याबरोबरच्या बालपणीच्या व नंतर नाटकातील आठवणी सांगून स्वरसंवादिनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नंतर लाडेवाडा मडकई येथील विमलानंद प्रस्तुत व दिग्दर्शक संदीप फडते यांचे पौराणिक संगीत नाटक गुरुदक्षिणा सादर करण्यात आले. संपूर्ण नाटक युवती व महिलांनी सादर केले. यावेळी निर्माता आणि दिग्दर्शक संदीप फडते यांचा खास गौरव झाला. 

टॅग्स :goaगोवाmusicसंगीत