शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गुजराती पर्यटकांची गोव्यामध्ये दिवसेंदिवस वाढतेय संख्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 14:42 IST

गुजराती पर्यटकांची संख्या गोव्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवाळीत मोठ्या संख्येने गुजराती बांधवांनी पर्यटनासाठी गोव्यामध्ये हजेरी लावल्याचे धारगळ आरटीओ चेक नाक्यावरील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. 

पणजी : गुजराती पर्यटकांची संख्या गोव्यात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवाळीत मोठ्या संख्येने गुजराती बांधवांनी पर्यटनासाठी गोव्यामध्ये हजेरी लावल्याचे धारगळ आरटीओ चेक नाक्यावरील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.  अलीकडच्या काळात गुजरातमध्ये टूर ऑपरेटर्सची संख्या वाढलेली आहे. गुजरातहून सुटणाऱ्या बस गाड्या महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे घेत महाबळेश्वर व पुढे गोवा, मंगळूरपर्यंत जातात. यंदा दिवाळीच्या सुट्टीत गुजरात रजिस्ट्रेशनच्या बसगाड्या मोठ्या संख्येने गोव्यात आल्या धारगळ आरटीओ चेक नाक्यावर नोंदीनुसार सर्वाधिक महसूल प्रवासी कराच्या स्वरूपात 24 ऑक्टोबरला वाहतूक खात्याला मिळाला. 1974 च्या मोटर वाहन कर कायद्यानुसार व्यावसायिक बसगाड्यांना प्रवासी कर आकारला जातो. 

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 55 लाख रुपये प्रवासी कर प्राप्त झाला होता. यंदा हा आकडा एक कोटीवर पोहोचला आहे. सरकारी कर्मचारी दिवाळीच्या सुट्टीत प्रवास भत्ता घेऊन सहलीवर येतात. सप्टेंबर महिन्यात 41 लाख 70 हजार रुपये प्रवासी कर स्वरूपात मिळाले.गेल्या महिन्यात 24 ऑक्टोबर या एकाच दिवशी आठ लाख रुपये प्रवासी कर मिळाला. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे मे महिना अखेरपर्यंत देशी पर्यटक गोव्यात हजेरी लावत असतात.किनारे, चर्च आणि मंदिरे, धबधबे त्याचबरोबर जलसफर घडवून आणणा-या क्रुझ बोटी, कॅसिनो आदी सर्वत्र पर्यटकांचे लोंढे दिसू लागले आहेत. गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचा माहोल असल्याने तेथील लोकांनी सहली काढल्या असाव्यात. जुने गोवे येथील सेंट झेविअर चर्च परिसरात तसेच राजधानी पणजी शहरात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात नेहमीचेच बनले आहेत.  15 लाख लोकसंख्या असलेल्या या राज्यात हजारोंच्या संख्येने देशी पर्यटक येत आहेत. कळंगुट, बागा, हणजुण, कोलवा, बेतालभाटी किना-यांवर बोटिंग, पॅराग्लाइडिंग तसेच जलक्रीडांसाठी गर्दी दिसून येते. केवळ किना-यांवरच नव्हे तर अन्य पर्यटनस्थळांवरही पर्यटक मोठ्या संख्येने दिसून येतात. 

राज्यातील हॉटेल फुल्ल आहेत. यंदा हंगामाची सुरवात ब-यापैकी झालेली आहे. गेल्या वर्षी ६३ लाख देशी पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा हा आकडा त्यापेक्षा अधिक असेल, असे संकेत मिळू लागले आहेत. गोव्यात साधारणपणे देशी पर्यटकांचे वास्तव्य तीन ते चार दिवस असते. या काळात गोव्यातील धार्मिक स्थळे, किनारे, धबधबे आदी पर्यटनस्थळांना भेट देत असतात.