शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

सर्वच इंग्रजी शाळांना अनुदान द्या : दिग्विजय सिंग

By admin | Updated: August 2, 2015 03:20 IST

पणजी : राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांना अनुदान द्यायला हवे, अशी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय

पणजी : राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांना अनुदान द्यायला हवे, अशी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणी व मराठी शाळांसह इंग्रजी माध्यमातील शाळांनाही अनुदान द्यायला हवे. भाजप सरकारने इंग्रजी शाळांना अनुदान सुरूच ठेवण्याचे विधेयक विधानसभेत आणून स्वत:च्या निर्णयास कायदेशीर रूप द्यावे ही फोर्स संघटनेची मागणी रास्तच आहे. इंग्रजी शाळांसाठी जे आंदोलन झाले किंवा सुरू आहे, त्यासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काँग्रेसला व चर्च संस्थेला दोष देणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असे दिग्विजय म्हणाले. सीबीआय चौकशी करा जैका प्रकल्पांशी संबंधित लुईस बर्जरच्या लाचप्रकरणी सरकारने सीबीआयमार्फत चौकशी करून घ्यावी, अशी आमची मागणी आहे. मी स्वत: दिगंबर कामत यांच्याशी शुक्रवारी बोललो तेव्हा त्यांनी मला त्यांच्याजवळ जैकाची फाईल देखील कधी आली नव्हती हे स्पष्टपणे सांगितले. जैका यंत्रणाच प्रत्येक निविदेवर लक्ष ठेवत होती. काँग्रेस पक्षाच्या कुठच्याही नेत्याविरुद्ध किंवा मुख्यमंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप झाला व त्याबाबत प्राथमिक देखील पुरावा दिसला तर लगेच आमचा पक्ष कारवाई करतो. भाजप मात्र देशभरातील आपल्या सर्व भ्रष्ट मंत्र्यांना व मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांनाही पूर्णपणे पाठीशी घालत आहे, अशी टीका सिंग यांनी केली. माविन गुदिन्हो यांना दक्षिण गोवा पीडीएचे चेअरमनपद देणे व मिकी पाशेको या आमदारास तुरुंगातून शिक्षा माफ करून मोकळे सोडणे, हे निर्णय घेणाऱ्या भाजपला नैतिकतेवर बोलण्याचा किंचितही अधिकार नाही, असे दिग्विजय सिंग म्हणाले. गुदिन्हो यांच्याविरुद्ध मनोहर पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेते असताना वीज घोटाळाप्रकरणी तक्रार केली होती. अजूनही सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. माविनने मला भेटून आपण भाजपच्या विरोधात जाऊ शकत नाही, असे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयातील आपले प्रकरण निभावल्यानंतर आपण पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होईन, असेही माविन मला सांगून गेले होते, असे दिग्विजय सिंग यांनी नमूद केले. दरम्यान, शुक्रवारी राज्यात १७ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले होते. इंग्रजी शाळांच्या समर्थकांनी हे आंदोलन केले होते. त्यात अनेक पालक सहभागी झाले होते. उत्तर व दक्षिण गोव्यातील पोलीस स्थानकांमध्ये या रास्ता रोकोप्रकरणी ८ हजार अज्ञातांवर गुन्हे नोंद झाले. (खास प्रतिनिधी)