शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Goa: ओसीआय कार्डवरून सरकारचे राजकारण, गाेवन्स फॉर गोवाचा आरोप

By पूजा प्रभूगावकर | Updated: April 22, 2024 12:38 IST

Goa News: ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक काळात सरकारने हा निर्णय घेणे , म्हणजे या विषयाचे राजकारण करणे होतो असा आरोप गाेवन्स फॉर गोवाचे पदाधिकारी केनेडी आफोन्सो यांनी पत्रकार परिषदेत केला.

- पूजा नाईक प्रभूगावकर पणजी - ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक काळात सरकारने हा निर्णय घेणे , म्हणजे या विषयाचे राजकारण करणे होतो असा आरोप गाेवन्स फॉर गोवाचे पदाधिकारी केनेडी आफोन्सो यांनी पत्रकार परिषदेत केला.

पासपोर्ट रद्द झाल्यानंतर अनेक गोमंतकीयांना जाचक अटींमुळे ओसीआय कार्ड मिळणे कठिण बनले होते. याप्रश्नी लक्ष घालावे म्हणून सरकारकडे मागणी केली होती. सदर विषय मागील दीड वर्षांपासून सुरु होता. या विषयी न्यायालयात याचिका केली असून त्यावर लवकरच सुनावणी होईल असे त्यांनी सांगितले.

आफोन्सो म्हणाले, की ओसीआय कार्डाचा दीड वर्षापासून केंद्र सरकारने तातकळत ठेवला. मात्र लोकसभा निवडणूका नजीक येताच आता केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन या विषयाचे राजकारण झाल्याचे दिसून येते असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाpassportपासपोर्ट