Goa: ओसीआय कार्डवरून सरकारचे राजकारण, गाेवन्स फॉर गोवाचा आरोप

By पूजा प्रभूगावकर | Published: April 22, 2024 12:37 PM2024-04-22T12:37:24+5:302024-04-22T12:38:07+5:30

Goa News: ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक काळात सरकारने हा निर्णय घेणे , म्हणजे या विषयाचे राजकारण करणे होतो असा आरोप गाेवन्स फॉर गोवाचे पदाधिकारी केनेडी आफोन्सो यांनी पत्रकार परिषदेत केला.

Govt's politics over OCI card, Governments for Goa allegation | Goa: ओसीआय कार्डवरून सरकारचे राजकारण, गाेवन्स फॉर गोवाचा आरोप

Goa: ओसीआय कार्डवरून सरकारचे राजकारण, गाेवन्स फॉर गोवाचा आरोप

- पूजा नाईक प्रभूगावकर 
पणजी - ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक काळात सरकारने हा निर्णय घेणे , म्हणजे या विषयाचे राजकारण करणे होतो असा आरोप गाेवन्स फॉर गोवाचे पदाधिकारी केनेडी आफोन्सो यांनी पत्रकार परिषदेत केला.

पासपोर्ट रद्द झाल्यानंतर अनेक गोमंतकीयांना जाचक अटींमुळे ओसीआय कार्ड मिळणे कठिण बनले होते. याप्रश्नी लक्ष घालावे म्हणून सरकारकडे मागणी केली होती. सदर विषय मागील दीड वर्षांपासून सुरु होता. या विषयी न्यायालयात याचिका केली असून त्यावर लवकरच सुनावणी होईल असे त्यांनी सांगितले.

आफोन्सो म्हणाले, की ओसीआय कार्डाचा दीड वर्षापासून केंद्र सरकारने तातकळत ठेवला. मात्र लोकसभा निवडणूका नजीक येताच आता केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन या विषयाचे राजकारण झाल्याचे दिसून येते असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Govt's politics over OCI card, Governments for Goa allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.