शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

अकादमीवर मोग नव्हे, गोविंदवर फोग! गोविंद गावडे यांची 'लोकमत'ला धडाकेबाज मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2024 12:54 IST

'टार्गेट' करण्यासाठी षडयंत्र, मंत्री गोविंद गावडे यांनी 'लोकमत' कार्यालयास भेट देऊन विविध विषयांवर सडेतोड भाष्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: कला अकादमीच्या बाबतीत आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधताना 'जे काही चाललेय ते कला अकादमीवरील प्रेमापोटी नव्हे तर मला टार्गेट करण्यासाठी निव्वळ षडयंत्र आहे', असा आरोप कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केला आहे. बुधवारी मंत्री गावडे यांनी 'लोकमत'च्या कार्यालयास भेट देऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी अकादमीच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेपासून सद्यःस्थितीसह आरोपांच्या घडामोडींवर सडेतोड भाष्य केले.

कला अकादमी नूतनीकरणाच्या बाबतीत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. निविदा न काढता नॉमिनेशन पध्दतीने कंत्राट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला होता, मी एकटा जबाबदार नाही. सर्व कामे योग्य पध्दतीने झाली आहेत व उर्वरीत सुरू आहेत. आता पावसाळ्यात छतावर वनस्पती वाढल्यानेच पाणी झिरपले. मात्र त्याचीही डागडुजी करण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले.

कला अकादमी सुरु होऊन २१० दिवस झाले. यापैकी १६८ दिवस बुकींग झाले व ३८९ वेगवेगळे कार्यक्रम झाले, कोणीही या वास्तूबद्दल कधीच तक्रार केली नाही. नाट्यगृह खुले झाल्यानंतर सर्वप्रथम 'स्वरमंगेश' हा संगीताचा कार्यक्रम झाला तेव्हाही काही तक्रार आली नाही, सुप्रसिध्द मराठी अभिनेते गिरीश ओक यांचा नाट्यप्रयोगही झाला. त्यांनी स्वतः मला नाट्यगृहात आता उत्तम व्यवस्था झालेली असल्याचे सांगून गौरवोद्‌गार काढले, असेही गावडे लोकमतशी बोलताना म्हणाले.

गावडे म्हणाले की, तांत्रिकी गोष्टींबाबत कोणतेही ज्ञान नसताना केवळ आरोप करायचे म्हणून केले जात आहेत. ज्यांनी अद्ययावत सुविधा कधी वापरल्या नाहीत किंवा त्याबद्दल कोणतेही ज्ञान नाही, असे लोकच आज विरोधात बोलत आहेत, नाट्यगृहात कोणी पूर्वीचे जुने दिवे वापरत नाहीत. उच्च दर्जाचे एलईडी दिवे वापरले जातात. त्यामुळे आधीच्या व्यवस्थेत आणि आताच्या यात तुलना करुन चालणार नाही, असेही ते म्हणाले.

आज जे काही कलाकार माझ्याविरोधात घोलताहेत व त्यांना जे साथ देत आहेत. त्यांनी केवळ कला अकादमीच नव्हे तर चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनने डिझाइन केलेली गोवा विद्यापीठाच्या वास्तूची आज काय गत झाली आहे हेही जाऊन बघा, असे थेट आव्हान केले. या वास्तुला तब्बल ५१ वर्षे झाली. कला अकादमीचा अध्यक्ष व या खात्याचा मंत्री बनल्यानंतर मीच या वास्तूचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले. यापूर्वी कोणीही असे धाडस केले नाही. मी पुढाकार घेतला नसता तर ही वास्तू कोसळली असती. शेवटी गावडे एका प्रश्नावर म्हणाले की, कला अकादमीचे हे नाट्यगृह पूर्णपणे सुरक्षित असून भजनी स्पर्धा तसेच कोकणी, मराठी अ गट नाट्यस्पर्धा व इतर कार्यक्रमही येथेच होणार आहे.

बांधकाम खात्याने अजून पूर्ण बिलही फेडलेले नाही. नूतनीकरणावर ४०० कोटी रुपये खर्च केल्याचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. प्रत्यक्षात बांधकामासाठी ४९ कोटी व साऊंड सिस्टम व इतर कामांसाठी १२ कोटी एवढाच खर्च झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने नूतनीकरणाचे काम केले असून अजून आम्ही पूर्ण बिलही फेडलेले नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षाच्या काळात कोणतीही समस्या निर्माण मोफत दुरुस्ती करुन देण्याची सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे.

चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनचे हात वर

गावडे म्हणाले की, कला अकादमीच्या समस्या आज कालची नव्हे. ही वास्तू मोडकळीस आल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये स्पष्ट झाले तेव्हा सर्वप्रथम या वास्तूचे डिझाइन केलेल्या चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनकडेच आम्ही संपर्क केलेला. परंतु कोणताही तोडगा काढण्याची किंवा तसेच नूतनीकरणानंतर काही वर्षे देखभाल खर्च उचलण्याचीही त्यांची तयारी नव्हती. २००४ पासून चाल्र्स कुरैय्या फाउंडेशन या वास्तूसाठी सल्लागार म्हणून काम करत होते. असे असताना एवढी वर्षे ते तोडगा काढू शकले नाहीत. या फाउंडेशनने हात वर केल्यानंतरच नवा कन्सल्टंट शोधला. फाउंडेशनचा प्रतिनिधी बैठकीलाही आला नाही. मधल्या काळात चार्ल्स कुरैय्या यांची कन्या मला भेटून गेली व काहीजण विनाकारण वा प्रकरणी गळा कावत असल्याचे मला म्हणाली. कला अकादमीच्या कामाची काडीची माहिती नसलेले लोक सध्या आरोप करत असल्याचे गावडे म्हणाले.

मी संघर्ष करणारा, कोणाला घाबरत नाही

आरोप करणारे काही कलाकार त्यांना हती ती पटे मिळू न शकल्याने मला लक्ष्य बनवत आहेत. काहींना कला अकादमीचे सदस्य सचिवपद हवे होते तर काहीजणांना पुरस्कार मिळू शकले नाहीत म्हणून ते नाराज आहेत. काहीजणांना प्रयोग सांज चे अध्यक्षपद हवे आहे. एकाला तर २० लाख रुपये अर्थसाहाय्य हवे आहे. कोणी गोमंतभूषण पुरस्कारासाठी धडपडत आहे. या गोष्टी साध्य झाल्या नाहीत म्हणून मला लक्ष्य करण्यात येत आहे. या कलाकारांना कला अकादमीबद्दल 'मोग नाही तर त्यांना माझ्यावर 'फोग' काढायचा आहे. गावडा कुटुंबातून मी आलो असून लहानपणापासून मी संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे आता काही बेडके (येथे) ओरडली तरी मी घाबरत नाही, असे मंत्री गावडे म्हणाले. विधानसभा अधिवेशन असल्याने येथे ओरडू लागलेत, असेही ते म्हणाले.

अकादमीच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांकडे सर्व माहिती

कला अकादमीच्या कामाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. अकादमीचे काम योग्य पद्धतीने व्हावे, कुठे कमतरता राहिली आहे का हे पाहण्यासाठी अहवाल मागविला आहे. अकादमाच्या कामाबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी सतत चर्चा होत असते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काम करीत आहे. बांधकाम खाते आणि वित्त खाते त्यांच्याकडे असल्याने अकादमीविषयीच्या सर्व गोष्टी त्यांना ज्ञात असल्याचेही गावडे म्हणाले.

मीसुध्दा एक कलाकार

गावडे म्हणाले की, मला लक्ष्य बनवणे हा काही असंतुष्ट कलाकारांचा एक कलमी कार्यक्रम आहे. मीसुध्दा एक कलाकार आहे. कला अकादमीवर खरोखरच जर प्रेम असते तर या कलाकारांना अहंकार बाजूला ठेवून नूतनीकरणात काय सुधारणा करता येतील किंवा कोणत्या नवीन गोष्ठी करता येतील हे सुचवायला हवे होते. परंतु तसा कोणीही कलाकार कोणतीही सूचना घेऊन माझ्याकडे आला नाही. उलट मीच तियात्र अकादमीचे तोमाझिन कार्दोङ्ग, रुद्रेश्वरचे देविदास आमोणकर, प्रवीण गावकर यांना विश्वासात घेऊन काही गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

म्हापशात रवींद्र भवनाला प्राधान्य

म्हापशातील रवींद भवनसाठी जमिनीकरिता कोमुनिदादकडे पत्र व्यवहार केलेला आहे. दोन ते तीन बैठकाही आलेल्या आहेत. जमीन निश्चित झाल्यावर प्रशासकीय मंत्री दिली जाईल व प्राधान्यक्रमे बांधकाम हाती घेतले जाईल, असे गावडे यांनी सांगितले. म्हापसा ही कलाकारांची भूमी आहे. त्यामुळे सरकारही येथे रवींद्र भवन उभारण्याचायत गंभीर आहे. गेली ७ वर्षे आम्ही जागा शोधत आहोत. रवींद भवनसाठी सांगे येथे जमीन उपलब्ध आहे.

'खुला रंगमंच' पडण्याचे कारण..

कला अकादमीचा खुला रंगमंच नूतनीकरणाचा भाग नव्हता. नूतनीकरण काळात ३ वर्षे तो बंद होता. त्यामुळे बहुतेक या कामाच्या हालचालीमुळे या वास्तूला तडा गेला असेल, पण हे नेमके याच कारणांमुळे झाले, असेही म्हणता येणार नाही. मात्र, आता याचेदेखील लवकरच काम सुरू होणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले. या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. पण याचा जास्त संबंध माझ्याशी नाही. मुळात फला अकादमी अजूनही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात असल्याने त्या खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पाठपुरवठा करीत आहेत. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना मी कला व संस्कृती मंत्री या नात्याने या खुल्या रंगमंचावर डॉम घालण्याचा विचार मांडला होता, जेणेकरून ते सुरक्षित राहिले असते आणि दिसायला पण सुंदर दिसले असते. पण नंतर कला अकादमीच्या स्लॅब गळती व इतर विषय आल्याने हा विचार मागे पडला. अकादमीची मुख्य वास्तू पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी प्राधान्य देत है नूतनीकरण सुरू करण्यात आले. पण या नादात खुल्या रंगमंचाचे छत कोसळले, असेही गावडे यांनी सांगितले.

कला गुण मिळायलाच हवेत

गावडे म्हणाले की, दहावी-बारावीच्या विद्याथ्यांना कला गुण देण्यासंबंधीचा प्रस्ताव गोवा शालान्त व उच्च माध्यमिक मंडळाकडे पडून असल्याचे गावडे म्हणाले. कला क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना है गुण मिळायलाच हवेत. जर का एखादा विद्यार्थी कला क्षेत्रात व क्रीडा अशा दोन्ही क्षेत्रात राज्य अथवा आंतरराज्य पातळीवर चमक दाखवत असल्यास ज्या क्षेत्रात जास्त गुण मिळतील, ते जमेस धराये, असे मला वाटते.

साउंड सिस्टम व्यवस्थित चालते की नाही, हे तपासण्यासाठी मी माझ्या नाटकाचा प्रयोग कला अकादमीच्या या नाट्यगृहात केला तेव्हा मलाही काहीच त्रुटी आढळल्या नाहीत. माइकच्या केबलबद्दल थोड़ी समस्या होती तो बदलला, पड़दा हळू सरकत होता ती समस्याही दूर केली. काही किरकोळ त्रुटी होत्या. अशा ४८ त्रुटी दाखवून त्या नीट करुन घेतल्या.

 

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत