शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सरकार स्थापनेला राज्यपालांचा अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 13:53 IST

'गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीत कॉंग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाचारण करणे हे राज्यपालांचे कर्तव्य असून राज्यपाल मृदुला सिन्हा मात्र कॉंग्रेस नेत्यांना भेटण्यासही तयार नाहीत'

ठळक मुद्दे'गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीत कॉंग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाचारण करणे हे राज्यपालांचे कर्तव्य असून राज्यपाल मृदुला सिन्हा मात्र कॉंग्रेस नेत्यांना भेटण्यासही तयार नाहीत' सद्यस्थितीत कॉंग्रेस हा राज्य विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष असून सरकार स्थापनेवर आपल्याच पक्षाचा अधिकार असल्याचे सांगून चोडणकर यांनी कर्नाटक राज्याचा दाखला दिला.राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेचे आमंत्रण द्यावे, आमचे बहुमत आम्ही राज्य विधानसभेत कधीही दाखवून देऊ शकतो, असे चोडणकर म्हणाले.

पणजी - गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीत कॉंग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाचारण करणे हे राज्यपालांचे कर्तव्य असून राज्यपाल मृदुला सिन्हा मात्र कॉंग्रेस नेत्यांना भेटण्यासही तयार नाहीत अशी माहिती देत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

चोडणकर म्हणाले, ‘‘गेले तीन दिवस आम्ही राज्यपालांची भेट मागत आहोत, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. राज्यपालांची नीती अशीच राहिली तर निषेध म्हणून राजभवनासमोर ठिय्या मांडण्यावाचून आमच्यासमोर अन्य पर्याय नसेल.’’ सद्यस्थितीत कॉंग्रेस हा राज्य विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष असून सरकार स्थापनेवर आपल्याच पक्षाचा अधिकार असल्याचे सांगून चोडणकर यांनी कर्नाटक राज्याचा दाखला दिला. त्रिशंकू विधानसभेची स्थिती टाळण्यासाठी तेथे सर्वांत मोठा असलेल्या कॉंग्रेसला राज्यपालांकडून पाचारण करण्यात आले आणि निधर्मी जनता दलाला पाठिंबा देत कॉंग्रेसने संयुक्त सरकार घडवले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेले बहुमत तुमच्याकडे आहे का असा प्रश्न केला असता चोडणकर म्हणाले की तो प्रश्न तुर्तास उपस्थित होऊ शकत नाही; राज्यपालांनी आम्हाला निमंत्रित करावे, आम्ही त्यांना बहुमताच्या समर्थनाची यादी देऊ. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देताना राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेचे आमंत्रण द्यावे, आमचे बहुमत आम्ही राज्य विधानसभेत कधीही दाखवून देऊ शकतो, असे चोडणकर म्हणाले. मात्र, संधी सोडाच, साधी भेटण्याची तयारीही राज्यपाल दाखवत नसून हा राज्यघटनेचा सरळ सरळ उपमर्द असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरPoliticsराजकारण